नागपूर 05 ऑगस्ट : कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील राखेचा तलाव फुटल्याने नागपूरच्या कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कामठी तालुक्यातील पाच गावांमध्ये या राखेमुळे नुकसान झालं होतं. याप्रकरणात आता प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात स्थापत्य विभागाचे अभियंता शिरीष वाठ आणि अॅश हँडलिंग प्लांटचे कार्यकारी अभियंता प्रवीण मडावी या दोन अधिकाऱ्यांना दोषी ठरवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली गेली आहे. पुण्याचे व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या मुलाविरोधात ईडीकडून चार्टशीट दाखल संबंधित तलाव हा राज्य सरकारच्या वीजनिर्मिती कंपनीचा असून तो 314 हेक्टरमध्ये पसरला आहे. वीजनिर्मितीसाठी जाळण्यात येणाऱ्या कोळशाच्या राखेतील घटक म्हणजेच FLY ASH मधील विषारी घटक यात असतात, असं तज्ञांनी सांगितलं. तलाव फुटल्याने हीच राख आसपासच्या 5 गावांमध्ये पसरली होती. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत कारवाई केली आहे. 16 जुलैला कोरडे औष्णिक विद्युत केंद्रातील खसाळा राखेचा तलाव फुटला होता. त्यामुळे लाखो टन राख ही पाण्यासोबत आजूबाजूच्या परिसरात वाहून गेली होती आणि प्रदूषणाचा मोठा धोका निर्माण झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तलाव फुटी प्रकरणात चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. फुकट संस्कृतीचा अतिरेक : कलर टीव्ही ते चंद्रावर सहल, राजकीय नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस नागपूरातील सततच्या पावसामुळे 16 जुलैला कोराडी औष्णिक विद्युत केंद्रालगत असलेला खसाळा राख बंधारा क्षमतेपेक्षा जास्त पाणीसाठ्यामुळे फुटला. यामुळे परिसरातील खसाळा, मसाळा, खैरी, कवठा, सुरादेवी या पाच गावांमध्ये पाणी शिरलं. सुदैवाने यात कुठलीही जीवितहाी झाली नाही. मात्र, प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित कारवाई केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.