पुण्याचे व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या मुलाविरोधात ईडीकडून चार्टशीट दाखल
पुण्याचे व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या मुलाविरोधात ईडीकडून चार्टशीट दाखल
याआधी नोव्हेंबर महिन्यात देखील ईडीने अविनाश भोसले यांना चौकशी केली होती. याशिवाय भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील एकूण 23 ठिकाणीही आयकर विभागाने छापा टाकला होता. 2
पुणे, 4 ऑगस्ट : पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले विरोधात ईडीने चार्टशीट दाखल करण्यात आली आहे. ARA प्रॉपर्टीज आणि इतर दोन प्रकरणात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. अविनाश भोसले यांचं ABIL हे मुख्यालय सरकारी आणि कमिशन ऑफिसर्स यांच्यासाठी राखीव असलेल्या जागेवर आहे. ही जमीन ईडीने मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात जप्त केली होती.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) सोमवारी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांच्यासह व्यावसायिक सत्येन टंडन यांच्याविरुद्ध चार्जशीट दाखल केली. येस बँक डीएचएफएलमध्ये (DHFL) ३,७०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ही चार्जशीट दाखल करण्यात आली.
गेल्या अनेक दिवसांपासून अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी सुरू होती. ईडीने 6 वर्षांपूर्वीच्या परकीय चलनाशी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात आली होती. अविनाश भोसले हे पुण्यात मोठे बांधकाम व्यावसायिक असून ते हॉटेल व्यावसायिक देखील आहेत. दरम्यान FEMA कायद्यांतर्गत त्यांची चौकशी केली जात असल्याची माहिती मिळते आहे.
याआधी नोव्हेंबर महिन्यात देखील ईडीने अविनाश भोसले यांना चौकशी केली होती. याशिवाय भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील एकूण 23 ठिकाणीही आयकर विभागाने छापा टाकला होता. 27 नोव्हेंबर 2020 रोजी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी करण्यात आलेली होती.
अविनाश भोसले आज कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे (ABIL Group) मालक आहेत. रिअल इस्टेट किंग अशी त्यांची पुण्यामध्ये ओळख आहे. अविनाथ भोसले यांच्या ओळखीतील लोक सांगतात की 80च्या दशकात ते रिक्षा चालवत असत. बांधकाम व्यवसायात आल्यानंतर सुरुवातीला कंत्राटदार ते आता पुण्यातील रिअल इस्टेट किंग अशी त्यांची ओळख आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.