• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 'घाव वर्मी बसला', सामनाच्या अग्रलेखावरून फडणवीसांचा शिवसेनेला टोला

'घाव वर्मी बसला', सामनाच्या अग्रलेखावरून फडणवीसांचा शिवसेनेला टोला

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

'आम्ही कोविड, वीज, शेती असे बरेच मुद्दे उचलले, त्यांना मात्र हे जनहिताचे मुद्दे दिसले नाही. त्यांना फक्त टोचणारे आणि बोचणारे मुद्दे दिसले'

  • Share this:
    नागपूर, 11 मार्च : 'अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget 2021) आम्ही कोविड,(Corona) वीज, शेती असे बरेच मुद्दे उचलले, त्यांना मात्र हे जनहीताचे मुद्दे दिसले नाही. त्यांना फक्त टोचणारे आणि बोचणारे मुद्दे दिसले. पण आजच्या सामनाच्या (samana newspaper) अग्रलेखामुळे कळले की घाव वर्मी बसला' अशा शब्दांत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शिवसेनेला (Shivsena) टोला लगावला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले आहे पण या अधिवेशनाच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक पाहण्यास मिळाली. आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सामनाच्या अग्रलेखावरून पुन्हा एकदा शिवसेनेवर जोरदार पलटवार केला आहे. ममता बॅनर्जींच्या पायाला गंभीर दुखापत, श्वास घेण्यासही त्रास! 'वीज मुद्द्यावर सरकारने लबाडी केली, ज्या प्रकारे पहिल्या दिवशी अधिवेशनात आश्वासन दिले की वीज कापणार नाही आणि शेवटच्या दिवशी अगदी विसंगत स्टेटमेंट केले हे फक्त अधिवेशन काढायचे म्हणून केले आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली. 'अर्थसंकल्पामध्ये आम्ही कोविड, वीज, शेती असे बरेच मुद्दे उचलले, त्यांना मात्र हे जनहिताचे मुद्दे दिसले नाही. त्यांना फक्त टोचणारे आणि बोचणारे मुद्दे दिसले. पण आजच्या अग्रलेखामुळे कळले की घाव वर्मी बसला', असा सणसणीत टोला फडणवीसांनी सेनेला लगावला. 60 पेक्षा जास्त एन्काऊंट करणाऱ्या सचिन वाझेंचा काय आहे शिवसेनेशी संबंध? अधिवेशनात काहीच फलित नाही. सगळ्यात महत्वाचे की विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची निराशा केली. कोविड वाढतो आहे, सरकारचे लक्ष नाही, व्यवस्था नाही. अधिवेशन असते तेव्हा तो वाढतो, मग अधिवेशन सुरू नसते तेव्हा तो कमी असतो आणि मग संपले की, तो पुन्हा वाढतो. सरकारला फक्त अधिवेशन टाळण्यासाठी कोरोना दिसतो, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. काय लिहिलंय 'सामना'मध्ये? संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षाला जास्त जबाबदारीने वागावे लागते, पण महाराष्ट्रात विरोधी पक्षाला अशा जबाबदारीची जाणीव फारशी दिसत नाही. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवारी शेवट झाला, पण सत्ताधाऱ्यांचे कामकाज रोखण्याशिवाय विरोधी पक्षाने काय दिवे लावले? सचिन वाझे (Sachin waze)या अधिकाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी विरोधी पक्षाची मागणी आहे. आता सरकारने वाझे यांची बदली क्राईम ब्रँचमधून केली. यात विरोधक जिंकले असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे. मृत हिरेन यांच्या पत्नीने पोलिसांना जे निवेदन दिले आहे, त्यानुसार त्यांनी सचिन वाझेंवर संशय व्यक्त केला आहे. आता संपूर्ण प्रकरणाचा तपास राज्याचे ‘एटीएस’ करीत आहे. त्यात केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे ‘एनआयए’ला घुसवले. त्यांचा तपास पूर्ण झाला नाही तोच सचिन वाझे यांना अटक करावी हा कुठला न्याय? मनसुख हिरेन यांच्या पत्नीस न्याय हवा आहे, पण ही काही न्यायदानाची पद्धत नाही, असा सवाल सेनेनं उपस्थितीत केला आहे. मनसुख हिरेन यांच्याप्रमाणेच मुंबईतदोन बळी गेले आहेत. अर्णब गोस्वामी याने केलेल्या छळामुळे अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली व हे प्रकरण फडणवीस मुख्यमंत्री असताना सरकारने दाबले होते. या प्रकरणाची फाईल सचिन वाझे यांनी उघडली व अर्णब गोस्वामी यास तुरुंगात टाकले. अर्णब गोस्वामी याने ‘टीआरपी’ घोटाळा करून सगळ्यांचीच फसवणूक केली. या टीआरपी घोटाळ्याचा तपासही वाझे हेच करीत आहेत. अर्णब गोस्वामी यास आत्महत्या, टीआरपी घोटाळ्यात जाबजबाब द्यावा लागेल, सचिन वाझे त्याची गर्दन पकडतील म्हणून वाझे यांच्या विरोधात विरोधी पक्ष आदळआपट करीत आहे काय? असा सवाल सेनेनं भाजपला विचारला. 19 वर्षीय मुलाने आईलाच संपवलं, 26 वर्षीय गर्लफ्रेंडच्या मदतीने काढला काटा 'वाझे यांनी भाजपच्या लाडक्या गोस्वामी महाशयांचे थोबाड बंद केले म्हणून मनसुख हिरेनप्रकरणी गोंधळ घालणे बरे नाही. मुंबईत याच काळात दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचे प्रकरण घडले. आत्महत्येमागची कारणे डेलकर यांनी एका चिठ्ठीत लिहून ठेवली. हा पुरावाच मानला जातो. डेलकर यांची पत्नी व मुले बुधवारी मुंबईत आले. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना निवेदन दिले व मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची चौकशी करावी असे सांगितले, पण ज्या तडफेने विरोधी पक्ष मनसुख हिरेन यांच्या मृत्यूची चौकशी करा असे बोलत आहे, त्या जोरकसपणे डेलकर व अन्वय नाईक यांच्या संशयास्पद मृत्यूचीही चौकशी करा, असे सांगताना दिसत नाही. मनसुख हिरेन यांचा मृत्यू जितका धक्कादायक तितकाच धक्कादायक मृत्यू खासदार डेलकर यांचा आहे. अन्वय नाईकप्रकरणी गोस्वामी हे जामिनावर सुटले आहेत यावर विरोधी पक्षाचे लोक काहीच कसे बोलत नाहीत?' असा सवालही सेनेनं उपस्थितीत केला.
    Published by:sachin Salve
    First published: