जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / 60 पेक्षा जास्त एन्काऊंटर करणाऱ्या सचिन वाझेंचा काय आहे शिवसेनेशी संबंध?

60 पेक्षा जास्त एन्काऊंटर करणाऱ्या सचिन वाझेंचा काय आहे शिवसेनेशी संबंध?

60 पेक्षा जास्त एन्काऊंटर करणाऱ्या सचिन वाझेंचा काय आहे शिवसेनेशी संबंध?

सचिन वाझे हे मूळचे कोल्हापूरचे आहे. 1990 चा बॅचमधील अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोल्हापूर, 11 मार्च :  संपूर्ण राज्यभरात सध्या एका पोलीस अधिकाऱ्याची जोरदार चर्चा होत आहे. मनसुख हिरेन प्रकरणी (Mansukh Hiren case) भाजपने (BJP) पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या निलंबनाची आणि अटकेची मागणी केली आहे. पण वाझे नेमकं आहेत कुठले, त्यांचा शिवसेनेशी (Shivsena) काय आहे संबंध? सचिन वाझे हे मूळचे कोल्हापूरचे आहे. 1990 चा बॅचमधील अधिकारी अशी त्यांची ओळख असून त्यांचे पूर्ण नाव सचिन हिंदुराव वाझे असं आहे. 1980च्या सालात विकेट कीपर आणि ओपनिंग बॅट्समन म्हणून कोल्हापूरमध्ये ते प्रसिद्ध होते. शाहूपुरी जिमखाना, मराठा स्पोर्टिंग या क्रिकेट संस्थांकडून चांगला क्रिकेटर म्हणून त्यांनी नाव नाव कमावलं होतं त्यानंतर ते 90 साली पोलीस दलामध्य दाखल झाले. आतापर्यंत सचिन वाझे यांनी अनेक मोठ्या मोठ्या गुन्ह्यांचा तपास केला आहे. 1990 साली उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात ते दाखल झाले होते. 1992 च्या दरम्यान ठाण्यात ज्यावेळी त्यांची पोस्टिंग करण्यात आली त्यावेळी त्यांनी अनेक मोठ्या गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना गजाआड केलं. मग सचिन वाझे यांची ओळख एक एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून झाली. पोलीस दलात काम करणारे प्रदीप शर्मा, दया नायक यांच्या सोबत सचिन वाझे यांचे नाव जोडलं गेलं. …म्हणून विरोधी पक्ष आदळआपट करीत आहे काय? सेनेचा भाजपला थेट सवाल आतापर्यंत मुंबई अंडरवर्ल्डमधील 60 पेक्षा अधिक गुंडांचा खात्मा यांनी केला आहे. त्यामध्ये दाऊद इब्राहिम गँग, छोटा राजन गँग असो किंवा इतर स्थानिक गुंड असो, त्यांना त्यांनी यमसदनी पाठवलं आहे. त्यामुळेच सचिन वाझे यांची एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख निर्माण झाली. 2002 साली ज्यावेळी घाटकोपरमध्ये बेस्ट बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यामध्ये युनूस नावाचा तरुण आरोपी फरार होता. त्यावेळी त्याच एनकाउंटर वाझे यांनी केल्याचे सांगितले जाते. महत्त्वाचे म्हणजे 2007 साली त्यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला होता. पण अनेक प्रकरणांचा तपास सुरू असल्याने त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला नव्हता. 4 लाखांना विकला गेला दुर्मिळ Smiley अजगर; काय आहे त्याच्यावरील स्माईलीचं रहस्य सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, 2008 सालच्या दसरा मेळाव्यात सचिन वाझे यांनी शिवसेनेत प्रवेश करून राजकारणात एन्ट्री केली होती आणि ते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवारी घेऊन निवडणूक लढवतील अशीही चर्चा होती. मात्र आतापर्यंत ही चर्चा अधुरीच राहिली. कोल्हापूरच्या रांगड्या मातीत मोठा झालेला पोलीस अधिकारी सध्या चांगलाच चर्चेत आहे. सध्या गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखपदावरून त्यांची बदली करण्यात करण्यात आली असली तरी त्यांच्याबद्दल सध्या अनेक वादही सुरू आहेत. त्यामुळे नेमकं सचिन वाझे यांच्याबाबत भविष्यात काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात