जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 5 वर्षांच्या मुलाचा दाबला गळा अन् आईनेही गळफास घेऊन संपवला जीव, जळगावमधील घटना

5 वर्षांच्या मुलाचा दाबला गळा अन् आईनेही गळफास घेऊन संपवला जीव, जळगावमधील घटना

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पूर्वीही उच्चशिक्षित होती. तिने एमएस्सीपर्यंत शिक्षण केले होते. आत्महत्येपूर्वी तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

अमळनेर, 18 जून : सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेनं आपल्या 5 वर्षांच्या मुलाला गळफास (Murder) देऊन आत्महत्या केल्याची मन सुन्न करणारी घटना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (amlner) तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील शिरुड इथं ही घटना घडली.  पूर्वी दीपक पाटील (सोनवणे) (वय 32) असं आत्महत्या करणाऱ्या विवाहितचे नाव आहे. तर ऋशांत उर्फ बिट्टू असं मुलाचं नाव आहे. सासरच्या मंडळीसोबत झालेल्या वादानंतर पूर्वीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे, असं वृत्त दिव्य मराठी ने दिलं आहे. शिरुड येथील वसंत बळीराम पाटील यांची मुलगी पूर्वी हिचा नंदुरबार येथील दीपक पाटील यांच्याशी विवाह झाला होता. सुखी संसार सुरू झाल्यानंतर त्यांना एक मुलगाही झाला. संसार सुखात सुरू असताना अचानक पूर्वीच्या आयुष्यात नवे वळण आहे. पूर्वीच्या माहेरच्या लोकांचा आणि सासरच्या लोकांच्या वाद झाला होता. त्यामुळे पूर्वी मुलासह माहेरी राहण्यासाठी आली होती. ( काबूलमधील गुरुद्वारावर दहशतवादी हल्ला; प्रार्थनास्थळी दिसले धुराचे लोट, VIDEO ) शुक्रवारी रात्री ती आपल्या मुलाला घेऊन झोपण्यासाठी गेली. मुलगा ऋशांत हा रोज आजी-आजोबांसोबत झोपत होता. पण, शुक्रवारी पूर्वी आपल्यासोबत मुलाला घेऊन गेली. त्यानंतर बराच वेळ झाला पण सुशांतचा आवाज येत नव्हता. त्यामुळे पूर्वीच्या खोलीत जाऊन पाहिले असता मुलगा ऋशांतचा मृतदेह पलंगावर आढळून आला तर पूर्वी हिने छताच्या लोखंडी कडीला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतला होता. या घटनेमुळे पाटील कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ( मुलांचा Screen Time कमी करायचाय? मानसशास्त्रज्ञांनी शेअर केल्या काही टिप्स ) पूर्वीही उच्चशिक्षित होती. तिने एमएस्सीपर्यंत शिक्षण केले होते. आत्महत्येपूर्वी तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. माझ्या सासरच्या लोकांना तोंडही दाखवू नका, अशी विनंती तिने चिठ्ठीत केली होती. पोलिसांनी ही चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास अमळनेर पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात