जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / काबूलमधील गुरुद्वारावर दहशतवादी हल्ला; प्रार्थनास्थळी दिसले धुराचे लोट, घटनेचा Live Video

काबूलमधील गुरुद्वारावर दहशतवादी हल्ला; प्रार्थनास्थळी दिसले धुराचे लोट, घटनेचा Live Video

काबूलमधील गुरुद्वारावर दहशतवादी हल्ला; प्रार्थनास्थळी दिसले धुराचे लोट, घटनेचा Live Video

गुरुद्वाराच्या आतून गोळ्यांचा आवाज येत असून इमारतीतून धूर निघत असल्याचंही समोर आलं आहे (Gurudwara Karte Parwan in Kabul under attack).

  • -MIN READ
  • Last Updated :

काबूल 18 जून : अफगाणिस्तानमधून मोठी बातमी समोर आली आहे. काबूलमधील गुरुद्वारा कर्ते परवानवर हल्ला झाला आहे. गुरुद्वाराच्या आतमध्ये सशस्त्र दहशतवादी असल्याची बातमी समोर आली आहे. गुरुद्वाराच्या आतून गोळ्यांचा आवाज येत असून इमारतीतून धूर निघत असल्याचंही समोर आलं आहे (Gurudwara Karte Parwan in Kabul under attack). घटनेचे काही व्हिडिओही समोर आले आहेत. हे व्हिडिओ घटनास्थळापासून काही अंतरावरुन शूट केले गेले आहेत. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की सुरुवातीला गुरुद्वारामधून गोळीबाराचा आवाज येत आहे. काहीच वेळात इथे धुराचे लोट पाहायला मिळतात. शीख बांधव आसपासच्या परिसरात उभा असलेले दिसतात. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं.

जाहिरात

अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी शनिवारी सकाळी अफगाणिस्तानच्या राजधानीतील गुरुद्वारा कार्ते परवानमध्ये प्रवेश केल्याचं वृत्त काबुलमधून समोर आलं आहे. राष्ट्रीय राजधानीत राहणार्‍या अफगाणिस्तान वंशाच्या शीखांनी सांगितलं की, त्यांना गुरुद्वारा कर्ते परवानचे अध्यक्ष गुरनाम सिंग यांचे फोन आले आहेत आणि त्यांना हल्ल्याची माहिती दिली आहे.

सशस्त्र अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले आहेत. यात किती जणांचा मृत्यू झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. इंडियन वर्ल्ड फोरमचे अध्यक्ष पुनीत सिंग चंधोक यांनी सांगितलं की, गुरनाम सिंग यांनी दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केल्याची माहिती दिली होती. त्यांनी अफगाणिस्तानातील अल्पसंख्याकांना त्वरित मायदेशी परत जाण्याचं आवाहन केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात