Home /News /lifestyle /

मुलांचा Screen Time कमी करायचाय? मानसशास्त्रज्ञांनी शेअर केल्या काही टिप्स

मुलांचा Screen Time कमी करायचाय? मानसशास्त्रज्ञांनी शेअर केल्या काही टिप्स

मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी मानसशास्त्रज्ञ, डॉ. जॅझमिन मॅककॉय (Psychologist, Dr. Jazmine McCoy) यांनी पालकांना एक वेळापत्रक बनवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी टीव्ही किंवा मोबाईल पाहण्याची परवानगी देण्याआधी मुलांसमोर काही अटी ठेवण्यास सांगितले आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 18 जून : कोरोनाच्या (Corona Virus) काळात सर्वांना सामाजिक अंतर बाळगण्याचे आवाहन करण्यात आले. ते त्यावेळी गरजेचेदेखील होते. मात्र त्याचा तोटा असा झाला की, लहान मुले असो किंवा घरातील इतर मोठे सदस्य सर्वजण मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही यांच्यामध्ये गुंतत गेले आणि आता सर्वांना त्याचे व्यसन लागले आहे. लहान मुलांवर याचा जास्त प्रभाव झाला. खरे तर यामध्ये सर्वस्वी मुलांचीही चूक नाही कारण व्हायरसचा प्रसार कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या कडक लॉकडाऊनमध्ये त्यांच्या ऑनलाइन वर्गादरम्यान मोबाइल आणि लॅपटॉप आवश्यक झाले आहेत. मात्र असे असले तरी आता मुलांचा स्क्रीन टाईम मर्यादित करणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांची संज्ञानात्मक वाढ कमी होते (Excessive Mobile Use Reduces Childes Cognitive Growth) आणि दृष्टीवर परिणाम होतो. ही काळाची गरज असल्याचे मान्य करून मानसशास्त्रज्ञ डॉ. जॅझमिन मॅककॉय (Psychologist, Dr. Jazmine McCoy) यांनी मुलांसाठी स्क्रीन टाइम मर्यादित करण्याबाबत काही टिप्स शेअर केल्या.

  डोकं दुखल्यास लगेच घेता पेनकिलर ? सावधान! होऊ शकतात गंभीर परिणाम

  सध्या मुलांचा कोणत्याही स्क्रीनसमोर राहण्याचा वेळ वाढत चालला आहे आणि ही एक गंभीर समस्या आहे. ही समस्या लक्षात घेऊन मानसशास्त्रज्ञांनी पालक त्यांच्या मुलांचा स्क्रीन वापर कसा मर्यादित करू शकतात (Psychologist Suggestion To Reduce Child's Screen Time) याबद्दल काही टिप्स दिल्या. त्यांनी सांगितले, “मुलांना सोशल मीडिया आणि आभासी वास्तव यांसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा परिचय देण्यापूर्वी पालकांनी त्यांच्यासोबत मुक्त संवाद करावा. पालकांनी डिजिटल सुरक्षितता आणि निरोगी स्क्रीन सवयींचा पाया तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. मुलांना जितक्या लवकर आपण या गोष्टी शिकवू तितके चांगले." त्यांनी नुकत्याच केलेल्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये चार टिप्स सुचवल्या आहेत. आपल्या मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्यासाठी पालक या टिप्सचा वापर करू शकतात.
  मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी मानसशास्त्रज्ञ, डॉ. जॅझमिन मॅककॉय यांनी पालकांना एक वेळापत्रक बनवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी टीव्ही किंवा मोबाईल पाहण्याची परवानगी देण्याआधी मुलांसमोर काही अटी ठेवण्यास सांगितले आहे (Make Rules To Use Screens). जसे की आधी गृहपाठ पूर्ण करणे. मुलांना स्क्रीनमध्ये गुंतवून थवेच्या एक पालक म्हणून बऱ्याचदा तुम्हाला सोयीचे वाटू शकते. कारण जेव्हा मुले स्क्रीनमध्ये गुंतलेली असतात तेव्हा तुम्ही तुमची महत्वाची कामे पूर्ण करू शकता. मात्र याचा उलट परिणाम देखील होऊ शकतो. यामुळे मुलांमध्ये राग, अवहेलना आणि वियोग या भावना निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे मुले तुमच्यापासून दुरावू शकतात.

  Superfood : खरंच? दूध आणि दही खाल्याने कमी होतो हृदयविकाराचा धोका?

  त्यांनी पुढे पालकांना घरामध्ये एक स्क्रीन-फ्री झोन (Make Screen-Free Zones) आणि स्क्रीन-फ्री वेळा ठरवण्याचा सल्ला दिला आहे (Decide Screen-Free Times). उदाहरणार्थ स्क्रीन-फ्री झोन तुमचे ​​स्वयंपाकघर असू शकते किंवा जेवणाचे टेबलदेखील असू शकतात, तर स्क्रीन-फ्री वेळ ही सर्व कुटुंबाने एकत्र बसून जेवतानाही असू शकते. अशाप्रकारे मुलांना या ठिकाणी आणि वेळांमध्ये स्क्रीन वापरू नये अशी सवय लागेल. त्याचबरोबर जेव्हा स्क्रीन टाईम असेल तेव्हा स्क्रीनद्वारे मुलांचा लोकांशी संवाद साधून द्यावा. असेही त्यांनी सुचवले. यामुळे मुलांना तंत्रज्ञान वापरण्याची एक महत्वाची बाजू कळेल. त्याचबरोबर पालकांनी आपल्या मुलांना शिकवण्यासाठी या माध्यमाचा वापर करावा असेही त्या म्हणाल्या. उदाहरणार्थ मुलांना चांगल्या सवयी शिकवणारे शो आणि चित्रपट दाखवावे.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, Mobile Phone, Parents and child

  पुढील बातम्या