मुंबई, 27 मार्च: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता तर मुंबईत एका डॉक्टरचा कोरोना व्हायरसनं बळी घेतला आहे. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये गुरुवारी रात्री उशीरा एका 82 वर्षांच्या डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्यांची Covid-19 ची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर हिंदुजा हॉस्पिटलचा आजूबाजूची 5 किलोमिटर परिसर सील करण्यात आला आहे. या परिसरात वाहतूक बंद असून कोणालाही प्रवेश दिला जात नाही आहे. दरम्यान, या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची चौकशी केली जात आहे. हेही वाचा… असा दिसतो भारतात थैमान घालणारा ‘कोरोना’, पुण्याच्या लॅबमध्ये काढला फोटो महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्यात आज एकूण 17 नवीन रुग्ण आढळले आहे. सांगलीमध्ये आज नवे 12 रुग्ण आढळले आहे. तर नागपूरमध्ये 5 रुग्ण आढळले असून राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्याही तब्बल 153 वर पोहोचली आहे. नवी मुंबईत दीड वर्षाच्या बाळाला कोरोनाची लगण झाली आहे. हेही वाचा… बारामतीत क्वारंटाईन केलेल्या नागरिकांचा पोलिसांवरच हल्ला, दगडफेकीत 5 जखमी घरातल्या सर्वच्या सर्व 6 जणांना कोरोनाची लागण इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, 26 मार्चला हिंदुजा रुग्णालयात एका 82 वर्षांच्या डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्यांची Covid-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. या डॉक्टरांचा नातू 12 मार्चला ब्रिटनहून परत आला होता. तो सेल्फ क्वारंटाइन होता. पण तरीही त्याच्या घरातल्या सर्वच्या सर्व 6 जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. कोरोनाव्हायरसचं थैमान जगभरात आता पुढच्या टप्प्यात पोहोचल्याचं स्पष्ट आहे. 5 लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे आणि मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. हेही वाचा… मुंबईत Coronavirus आणखी वाढला, पॉझिटिव्ह 86 तर मृत्यू 5 मुंबईत आज सापडलेल्या 9 कोरोनाग्रस्तांमध्ये 3 महिला आणि 6 पुरुष आहेत. यातल्या तिघांना कुर्ल्याच्या भाभा रुग्णालयात तर 6 जणांना कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. सध्या मुंबईत संशयित रुग्णांसह 209 कॉरोनाग्रस्त दाखल आहेत. भारतात आतापर्यंत 724 रुग्ण सापडले असून त्यातले 66 बरे झाले आहेत, तर 17 मृत्युमुखी पडले आहेत. त्यातले 5 मुंबईतले आहेत. दुसरीकडे आज सांगलीमध्ये एकाच दिवसात तब्बल 12 जणांना लागण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण सांगलीत आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णाचा आकडा हा 23 वर पोहोचला आहे. तर राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 153 वर पोहोचली आहे. सांगलीच्या इस्लामपूरमधील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये आता दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. शहरात राहणाऱ्या आणखी 25 जणांचे रिपोर्ट पाठवण्यात आले होते. यामध्ये तब्बल 12 जणांना लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







