मुंबई, 27 मार्च : मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये आज पुन्हा भर पडली आहे. दिवसभरात 9 रुग्णांची नोंद झाली. त्यांना भाभा रुग्णालयात आणि कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईत आता कोरोनाग्रस्तांची संख्या 86 झाली आहे. काल मुंबईत एका डॉक्टरचा मृत्यू झाला. त्यामुळे एकाच शहरात आतापर्यंत 5 मृत्यू झाले आहेत. राज्यातच नाही तर देशात हा सगळ्यात जास्त आकडा आहे. मुंबईत आज सापडलेल्या 9 कोरोनाग्रस्तांमध्ये 3 महिला आणि 6 पुरुष आहेत. यातल्या तिघांना कुर्ल्याच्या भाभा रुग्णालयात तर 6 जणांना कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. सध्या मुंबईत संशयित रुग्णांसह 209 कॉरोनाग्रस्त दाखल आहेत. 26 मार्चला हिंदुजा रुग्णालयात एका 82 वर्षांच्या डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्यांची Covid-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. या डॉक्टरांचा नातू 12 मार्चला ब्रिटनहून परत आला होता. तो सेल्फ क्वारंटाइन होता. पण तरीही त्याच्या घरातल्या सर्वच्या सर्व 6 जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबईच्या चाळीत पोहोचला Corona; या 4 रुग्णांमुळे परिस्थिती जाऊ शकते हाताबाहेर भारतात आतापर्यंत 724 रुग्ण सापडले असून त्यातले 66 बरे झाले आहेत, तर 17 मृत्युमुखी पडले आहेत. त्यातले 5 मुंबईतले आहेत.
5 new Coronavirus positive cases in Mumbai and 1 in Vashi; The total number of positive cases in Maharashtra rises to 153: Health Department, Maharashtra
— ANI (@ANI) March 27, 2020
दुसरीकडे आज सांगलीमध्ये एकाच दिवसात तब्बल 12 जणांना लागण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण सांगलीत आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णाचा आकडा हा 23 वर पोहोचला आहे. तर राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 153 वर पोहोचली आहे. सांगलीच्या इस्लामपूरमधील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये आता दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. शहरात राहणाऱ्या आणखी 25 जणांचे रिपोर्ट पाठवण्यात आले होते. यामध्ये तब्बल 12 जणांना लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. वुहानसारखं मुंबई होणार देशातलं कोरोनाव्हायरसचं केंद्र?

)







