बारामती, 27 मार्च: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाईन केलेल्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये, त्यांनी घरातच थांबावे, असं राज्य सरकारने आवाहन केले आहे. तरी देखील बारामती शहरात क्वारंटाईन केलेले नागरिक रस्त्यावर फिरत असल्याचे समोर आलं आहे. त्यात जोशी समाजातील काही नागरिकांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांना हटकलं असता त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला. जमावाने केलेल्या दगडफेकीत 2 पोलिस अधिकारी, महिला पोलिस अधिकाऱ्यांसह 5 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. हेही वाचा… संचारबंदीमुळे वेळेत गावी पोचला नाही मुलगा, उपचाराअभावी विझली वडिलांची प्राणज्योत या घटनेची माहिती मिळताच बारामती शहर पोलिस घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी जोशी समाजाच्या 15 जणांना ताब्यात घेतले आहे. मिळालेली माहिती अशी की, जळोची परिसरात जोशी समाजातील काही जणांना क्वारंनटाईन करण्यात आलं आहे. आरोग्य विभागाने त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला आहे. असं असताना या समाजातील काही युवक या परिसरात फिरत होते. याला येथील गावकऱ्यांनी अटकाव केला. काही गावकऱ्यांना क्वारंटाईन केलेल्या नागरिकांनी मारहाण केली. त्यानंतर बारामती शहर पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिस जमावाला पांगवण्यासाठी गेले असता जोशी समाजाच्या महिला व नागरिकांनी पोलिसांवर आणि स्थानिकांवर दगडफेक केली. यात बारामती शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील, एपीआय, एक महिला अधिकारा, 2 महिला पोलिस कर्मचारी व तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. हेही वाचा… कोरोनाच्या उद्रेकात कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक, कंपनीकडून 25 टक्के जादा पगार या प्रकरणात जळोची गावात तणावपूर्ण वातावरण असून या भागात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी जोशी समाजाच्या पंधरा जणांना ताब्यात घेतले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







