Home /News /pune /

असा दिसतो भारतात थैमान घालणारा ‘कोरोना’, शास्त्रज्ञांनी पुण्याच्या लॅबमध्ये काढला फोटो

असा दिसतो भारतात थैमान घालणारा ‘कोरोना’, शास्त्रज्ञांनी पुण्याच्या लॅबमध्ये काढला फोटो

शास्त्रज्ञांना मिळालेल्या या यशाचा कोरोनावर लस शोधण्यासाठी जे संशोधन सुरू आहे त्यात फायदा होणार आहे.

    पुणे 27 मार्च : कोरोनाने जगभर थैमान घातलं आहे. जगातले 150 पेक्षा जास्त देश त्याने ग्रासले आहेत. मात्र अजुनही त्यावर औषध सापडलेलं नाही. भारतातल्या जवळपास सर्वच राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. COVID 19 या कुटुंबातला असलेल्या या व्हायरचा फोटो मिळविण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आलं आलं. पुण्यातल्या प्रयोगशाळेतल्या शास्त्रज्ञांनी Transmission electron microscope imaging चा वापर कर त्या व्हायरसला कॅमेऱ्यात कैद केलं आहे. त्याबाबतची माहिती Indian Journal of Medical Research मध्ये प्रकाशीत झाल्याचं वृत्त Hindustan Timesने दिलं आहे. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर 30 जानेवारीला वुहानमध्ये शिकणारे काही विद्यार्थी भारतात परतले होते. त्यांच्या घशातल्या द्रावांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी आले होते. भारतातली ती पहिलीच चाचणी होती. त्या तिघांचीही टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. त्या नमुन्यातून हे फोटो मिळविण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे. कोरोनावर सध्या लस मिळालेली नाही. सर्व जगात त्यावर संशोधन सुरू आहे. भारतात एकवेम आणि विख्यात असलेल्या National Institute of Virology (NIV)मध्येही त्यावर संशोधन सुरु आहे. तिथल्या शास्त्रज्ञांना हे यश मिळालं असून पुढच्या संशोधनात त्याचा फायदा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हे वाचा -  BREAKING ब्रिटनला मोठा धक्का, पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना कोरोनाची लागण मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये आज पुन्हा भर पडली आहे. दिवसभरात 9 रुग्णांची नोंद झाली. त्यांना भाभा रुग्णालयात आणि कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईत आता कोरोनाग्रस्तांची संख्या 86 झाली आहे. काल मुंबईत एका डॉक्टरचा मृत्यू झाला. त्यामुळे एकाच शहरात आतापर्यंत 5 मृत्यू झाले आहेत. राज्यातच नाही तर देशात हा सगळ्यात जास्त आकडा आहे. मुंबईत आज सापडलेल्या 9 कोरोनाग्रस्तांमध्ये 3 महिला आणि 6 पुरुष आहेत. यातल्या तिघांना कुर्ल्याच्या भाभा रुग्णालयात तर 6 जणांना कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. सध्या मुंबईत संशयित रुग्णांसह 209 कॉरोनाग्रस्त दाखल आहेत. हे वाचा -  बापरे... स्पेन आणि इटलीत ‘मॉल’चं झालं शवगृह, दफविधीसाठीही वेटिंगलिस्ट 26 मार्चला हिंदुजा रुग्णालयात एका 82 वर्षांच्या डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्यांची Covid-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. या डॉक्टरांचा नातू 12 मार्चला ब्रिटनहून परत आला होता. तो सेल्फ क्वारंटाइन होता. पण तरीही त्याच्या घरातल्या सर्वच्या सर्व 6 जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या