मुंबई, 08 नोव्हेंबर : ‘कुणीही महिलाबद्दल अपशब्द काढू नये. अतिशय चुकीचे आहे. आम्ही त्याचा विरोध करू. जसे आमच्या कडच्या मंडळींना जसे नियम लागू आहे तसे त्यांना देखील लागू आहे’, असं म्हणत भाजप चे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची कानउघडणी केली. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अत्यंत खालच्या भाषेत वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानाबाजीवर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली. ‘कुणीही महिलाबद्दल अपशब्द काढू नये. अतिशय चुकीचे आहे. आम्ही त्याचा विरोध करू. जसे आमच्या कडच्याना जसे लागू आहे तसे त्यांना देखील लागू आहे. राजकारणात आचारसंहिता पाळली पाहिजे. दोन्ही बाजूने आचारसंहिता पाळली पाहिजे, असं म्हणत फडणवीस यांनी सत्तार यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. (छत्रपती शिवाजी महाराज विरुद्ध बाजीप्रभू देशपांडे हे महाराष्ट्र पचवेल? आव्हाड का असं म्हणाले?) तसंच, आचारसहिंता दोन्ही बाजूने पाळली पाहिजे. सत्तार चुकले. पण खोक्यांची भाषा योग्य नाही. राजकारणामध्ये बोलण्याची पातळी खूप खाली चालली आहे. सगळीकडच्या लोकांनी आचार संहिता पाळली पाहिजे मोठ्या नेत्यांनी आपल्या लोकांना सांगितलं नाही, तोवर हे शक्य नाही , असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे फडणवीस यांनी तक्रार केली आहे. ( ‘हर हर महादेव’ शो बंद पाडला, प्रेक्षकाला मारहाण, आव्हाडांच्या 100 समर्थकांवर गुन्हे दाखल ) हर हर महादेव हा सिनेमा मी पाहिला नाही. त्यात काय वाद आहे मला माहित नाही. कुणाला जर त्याबद्दल आक्षेप असतील तर त्यांनी सनदीशीर पद्धतीने मांडावे पण अशा पद्धतीने कुणी थिएटरमध्ये घुसून लोकांना मारत असेल तर ते सहन केले जाणार नाही कारवाई केली जाईल, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. ‘मत स्वातंत्र्य सगळ्यांना आहे. काही आक्षेप असेल तर बोला. पण कायदा सुवियवस्था कोणीही हातात घेवू नये. जे कायदा सुव्यवस्था हाती घेतील त्यांच्यावर कारवाई होईल’ असंही फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.