मुंबई 23 जुलै : राज्यातील राजकीय घडामोडींना गेल्या काही आठवड्यांपासून प्रचंड वेग आलेला आहे. शिवसेनेतील मोठं बंड, उद्धव ठाकरेंचा राजीनामा, महाविकास आघाडीचं सरकार कोसळणं तसंच एकनाथ शिंदे गट आणि भाजपचं राज्यात सरकार स्थापन करणं, अशा अनेक घडामोडी या काळात घडल्या आहेत. मात्र, हे सगळं इथेच थांबलं नाही, तर शिवसेनेतील गळती आता थांबायचं नाव घेत नाहीये. यादरम्यान महाविकास आघाडीतील नेत्यांकडून राज्य सरकारवर सडकून टीका केली जात आहे. आता सुप्रिया सुळे यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. ‘नारायण राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिलेली आणि आता एकनाथ शिंदे..’ नितेश राणेंचा गंभीर आरोप सुप्रिया सुळे म्हणाल्या, की दिल्लीच महाराष्ट्र चालवत आहे. दिल्लीची वारी करुन महाराष्ट्र दिल्लीत झुकविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सरकारने संसार नीट करावा. रोज दिल्लीत जाऊन सासूबाईला प्रश्न विचारू नये, नाहीतर सासूबाईने आपला रंग दाखवला की कळेल. महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान दिल्ली करत आहे, असंही त्या म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या, की दिल्लीत काही तास मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी वेळही देत नाहीत. दिल्लीत रोज महाराष्ट्र झुकत आहे. सव्वा महिना झाला, हे सारखे दिल्लीला पळत आहेत. मराठी माणसाची अस्मिता संपुष्टात आली आहे. केंद्र सरकार महाराष्ट्रात दडपशाहीचं राजकारण करत आहे. शिंदे सरकारचा मोठा निर्णय: राज्यातील ही 2 महत्त्वाची प्रकरणं CBI कडे वर्ग करण्याचे निर्देश सरकारने महत्त्वाची दोन प्रकरणे सीबीआयकडे वर्ग करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. यावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, की महाराष्ट्राच्या पोलिसांवर सरकारचा विश्वास नाही. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचं पाप हे सरकार करत आहे. फोन टॅपिंग प्रकरणात महाराष्ट्रच्या पोलिसावर विश्वास नाही. महाराष्ट्रतून मत घेतात मग महाराष्ट्रच्या जनतेवर विश्वास का नाही, असा आरोप त्यांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.