मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शिंदे सरकारचा मोठा निर्णय: राज्यातील ही 2 महत्त्वाची प्रकरणं CBI कडे वर्ग करण्याचे निर्देश

शिंदे सरकारचा मोठा निर्णय: राज्यातील ही 2 महत्त्वाची प्रकरणं CBI कडे वर्ग करण्याचे निर्देश

राज्यातील आणखी 2 महत्त्वाची प्रकरणं सीबीआयकडे वर्ग करण्याचे निर्देश राज्य शासनाच्या गृह विभागाने पोलिसांना दिले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 23 जुलै : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्यात सरकार स्थापन केलं आहे. यानंतर शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली आहे. तसंच अनेक ठिकाणचा निधीही रोखला आहे. यापाठोपाठ आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नव्या सरकारने आता आणखी एक नवा निर्णय घेत राज्यातील 2 महत्त्वाची प्रकरणं सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यात सत्तांतर होताच महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात दाखल झालेले गुन्हे केंद्रीय यंत्रणांकडे वर्ग केले जात आहेत. आता राज्यातील आणखी 2 महत्त्वाची प्रकरणं सीबीआयकडे वर्ग करण्याचे निर्देश राज्य शासनाच्या गृह विभागाने पोलिसांना दिले आहेत.

रत्नागिरीत शिवसेना VS शिवसेना; बॅनरवरुन दोन गटातील वाद चिघळणार? मोठा पोलीस बंदोबस्त

कोणती आहेत ही 2 महत्त्वाची प्रकरणं ?

1) भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह 28 जणांवर खंडणी आणि गुन्हेगारी कट रचल्याचा दाखल गुन्हा आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे. खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 29 आरोपींनी पुणे पोलिसांवर केलेल्या आरोपांची चौकशीही सीबीआय करणार आहे.

तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा अधिवेशनात गाजलेला पेन ड्राईव्ह बॉम्ब गिरीश महाजन यांच्यावर दाखल गुन्ह्यातील दाहक वास्तव उघड करणारा होता. या खळबळजनक प्रकरणात अनेक धक्कादायक घडामोडी येत्या दिवसात होणार असल्याचं बोललं जात आहे. तत्कालीन सरकारी वकील प्रविण चव्हाण, काही पोलीस अधिकारी तर काही बडे राजकीय नेते आता CBI च्या रडारवर आहेत. कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा खरा की खोटा ? याचाही तपास होणार आहे. तपासात हा गुन्हा खोटा असल्याचं निष्पन्न झालं तर फिर्यादीही अडचणीत येणार आहे.

shiv sena saamana Editorial : शिवसेनेकडून भाजपचे ‘या’ कारणासाठी कौतुक, भाजपच्या शिडीवर ठेवलेले हे पहिले पाऊलच…

2) फोन टॅपिंग अहवाल लीक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपासही सीबीआयकडे वर्ग करण्यात येणार आहे. तपास हस्तांतरित करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. हस्तांतरण प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. सीबीआयनं होकार दिल्यानंतर केस पेपर हस्तांतरण होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. फोन टॅपिंग प्रकरण CBI कडे देण्याच्या निर्णयामुळे रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा मानला जात आहे.

First published:

Tags: Eknath Shinde, Girish mahajan