मुंबई 19 ऑगस्ट : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना 1 ऑगस्टला अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून त्यांना आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याची सुनावणी न्यायालयात झाली. यासाठी राऊत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते. मेधा सोमय्या यांच्या याचिकेवरील सुनावणीवेळी संजय राऊत यांनी आपल्यावरील आरोप निराधार असल्याचं सांगितलं आहे. संजय राऊत वापरायचे या बिल्डरच्या लक्झरी कार; ED तपासात मोठी माहिती समोर संजय राऊत यांची वक्तव्ये सकृतदर्शनी मानहानीकारक आहेत, अशी टिप्पणी करत शिवडी महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने राऊत यांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश याआधी दिले होते. मात्र, संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडींतर्गत आर्थर रोड जेलमध्ये असल्याचं मेधा सोमय्या यांचे वकील सनी जैन यांनी सांगितलं. त्यानंतर न्यायाधीशांनी राऊत यांना व्हि़डिओ कॉनफरंसिंगद्वारे हजर करण्याचे निर्देश दिले. यानंतर राऊतांना विचारणा करण्यात आली की तुम्हाला हे आरोप मान्य आहेत का? न्यायाधीशांच्या या प्रश्नावर उत्तर देत राऊत यांनी हे आरोप अमान्य असल्याचं म्हटलं. ते म्हणाले की मला माझ्या वकिलांसोबत चर्चा करण्याची संधी मिळाली नाही. मी दोषी नाही, माझ्यावरील आरोप खोटे आणि निराधार आहेत, असा दावा राऊत यांनी यावेळी केला. ‘ते पुन्हा येणार’! शिंदे सरकार महाराष्ट्रातील CBI वरील बंदी उठवण्याच्या तयारीत मेधा सोमय्या यांची तक्रार - मीरा-भाइंदर महापालिका क्षेत्रात सार्वजनिक शौचालयांची उभारणी आणि देखभालीच्या प्रकल्पात शंभर कोटी रुपयांचा घोटाळा झाला. त्यात सोमय्या कुटुंबीयांच्या युवा प्रतिष्ठान संस्थेचा सहभाग आहे, असा आरोप करून राऊत यांनी माझी मानहानी केली, असा दावा करत मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.