जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / संजय राऊत वापरायचे या बिल्डरच्या लक्झरी कार; ED तपासात मोठी माहिती समोर

संजय राऊत वापरायचे या बिल्डरच्या लक्झरी कार; ED तपासात मोठी माहिती समोर

संजय राऊत वापरायचे या बिल्डरच्या लक्झरी कार; ED तपासात मोठी माहिती समोर

पत्राचाळ प्रकरणाचा तपास करणार्‍या अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या चौकशीत असं समोर आलं आहे की संजय राऊत आणि त्यांचे कुटुंबीय मुंबई पूर्व उपनगरातील एका बिल्डरच्या मालकीच्या दोन गाड्यांचा वापर करत होते. (luxury vehicles of sanjay raut)

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 19 ऑगस्ट : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना 1 ऑगस्टला अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून त्यांना आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. दरम्यान राऊत यांच्याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पत्राचाळ प्रकरणाचा तपास करणार्‍या अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या चौकशीत असं समोर आलं आहे की संजय राऊत आणि त्यांचे कुटुंबीय मुंबई पूर्व उपनगरातील एका बिल्डरच्या मालकीच्या दोन गाड्यांचा वापर करत होते. मनीष सिसोदियांच्या घरावर CBI चा छापा; ‘..म्हणूनच देश मागे राहिला’ दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांचं ट्विट ही दोन आलिशान वाहनं श्रद्धा डेव्हलपर्सच्या संचालकांची आहेत, ज्यांचे संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांच्या मतदारसंघात अनेक चालू आणि पूर्ण झालेले प्रकल्प आहेत. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. बुधवारी, ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईच्या पूर्व उपनगरातील रिअल इस्टेट डेव्हलपरच्या परिसरासह मुंबईतील अनेक ठिकाणी झडती घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, पत्राचाळ प्रकरणाशी संबंधित शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक केल्याच्या संबंधात शोध घेण्यात आला. कारण राऊत आणि कुटुंबातील सदस्य रिअल इस्टेट फर्म श्रद्धा डेव्हलपर्सच्या संचालकांची दोन वाहनं वापरत होते. ईडीच्या पथकांनी मुलुंडमधील श्रद्धा डेव्हलपर्सच्या परिसरात अनेक कागदपत्रे आणि संगणक तपासले. श्रद्धा डेव्हलपर्सचे भांडुप, मुलुंड आणि विक्रोळी सारख्या भागात अनेक पूर्ण झालेले आणि चालू असलेले प्रकल्प आहेत, जे राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांच्या विधानसभा मतदारसंघात येतात. रायगडमधील संशयास्पद बोटीमुळे सावधगिरी; रायगड मुंबईसह पुण्यात हाय अलर्ट, शहरात नाकाबंदी 31 जुलै रोजी संजय राऊत यांच्या आवारात छापा टाकला असता ईडीच्या अधिकाऱ्यांना असं आढळून आलं होतं की, शिवसेना खासदार आणि कुटुंब वापरत असलेली दोन आलिशान वाहनं श्रद्धा डेव्हलपर्सच्या संचालकांची आहेत. सूत्रांनी सांगितलं की, ईडीने बुधवारी अवनी इन्फ्रास्ट्रक्चरवरही छापा टाकला. ही कंपनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि पत्रा चाळ प्रकरणातील मुख्य आरोपी प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांनी सुरु केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात