मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'ते पुन्हा येणार'! शिंदे सरकार महाराष्ट्रातील CBI वरील बंदी उठवण्याच्या तयारीत

'ते पुन्हा येणार'! शिंदे सरकार महाराष्ट्रातील CBI वरील बंदी उठवण्याच्या तयारीत

ठाकरे सरकार सत्तेत असताना परवानगीशिवाय राज्यात सीबीआयला तपासणीचे अधिकार नव्हते (CBI Ban in Maharashtra). परंतु आता सत्तांतर झाल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकारकडून सीबीआयला तपासाचे अधिकार दिले जाणार आहेत.

    मुंबई 19 ऑगस्ट : महाविकास आघाडी सरकारने राज्यात तपास करण्यासाठी सीबीआयला बंदी घातली होती. मात्र, आता शिंदे-फडणवीस सरकार महाविकास आघाडीला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. राज्यातील सीबीआयवरील ही बंदी उठवण्यासाठीत्या हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्रात सीबीआयला घातलेली बंदी लवकरच उठवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्धव ठाकरेंना कोकणातून आणखी एक धक्का, 41 वा आमदार शिंदेंकडे जाणार! ठाकरे सरकार सत्तेत असताना परवानगीशिवाय राज्यात सीबीआयला तपासणीचे अधिकार नव्हते. परंतु आता सत्तांतर झाल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकारकडून सीबीआयला तपासाचे अधिकार दिले जाणार आहेत. याबद्दलचा निर्णय लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता सीबीआयला राज्यात एखाद्या प्रकरणाची चौकशी करायची असल्यास कोणाच्या परवानगीची गरज भसणार नाही. यानंतर आता विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात आवाज उठवताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं केंद्र सरकार केंद्रीय संस्थांचा दुरुपयोग करत राज्यांमध्ये विविध कारवाया करत आहे. त्यामुळे राज्यातील लोकांचा सरकारवरचा विश्वास कमी होत आहे, असं म्हणत विरोधत या निर्णयाला विरोध करत आहेत मनीष सिसोदियांच्या घरावर CBI चा छापा; '..म्हणूनच देश मागे राहिला' दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांचं ट्विट या राज्यांमध्येही सीबीआयला बंदी - फक्त महाराष्ट्रातच नाही तर आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड सरकारनेही सीबीआयला राज्यात तपासासाठी परवानगी घेणं बंधनकारक केलं होतं. या राज्यांनीही आपल्या राज्यात सीबीआयच्या हस्तक्षेपावर बंदी घातली.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: CBI, Eknath Shinde

    पुढील बातम्या