मुंबई, 4 ऑक्टोबर : नवरात्रोत्सव म्हणजेच दुर्गापूजा हा बंगालमधील प्रमुख सण आहे.
नवरात्री
च्या दिवसांमध्ये दुर्गापूजेचा काळात बंगालमध्ये चैतन्याचे वातावरण असते. सर्व अबालवृद्ध या उत्सवात सहभागी होतात. बंगाली माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी तो दुर्गापूजेचा उत्सव साजरा करतो. मुंबईतील बंगाली बांधवही त्याला अपवाद नाहीत. मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये दरवर्षी बंगाल क्लबच्या माध्यमातून दुर्गोत्सव साजरा करतात. नवरात्रीमधील षष्ठीच्या दिवशी या उत्सवाला सुरूवात होते. दसऱ्याच्या दिवशी या उत्सवाची सांगता होते. यंदा बंगाल क्लबला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर त्यांचा 87 वा दुर्गोत्सव साजरा होत आहे. काय आहे प्रमुख आकर्षण? बंगाल मधील पुरातन मंदिरांच्या कलाकृती एकत्र साकारून यंदा देखावा तयार करण्यात आला आहे. तसेच 100 वर्ष जुन्या मंदिराच्या देखव्यात दुर्गा देवीची स्थापना करण्यात आली आहे. कोलकाता येथील ड्रमर्स या उत्सवाचे विशेष आकर्षण आहे. यंदा देवीची मूर्ती ही 17 फुट उंच असून ती मुंबईतील सर्वात उंच मूर्ती आहे.
दसऱ्याच्या पूजेसाठी शूभ मुहूर्त काय? आपट्यांच्या पानांना का आहे महत्त्व? पाहा Video
हा दुर्गोत्सव कुठे सुरु आहे? दादर येथील शिवाजी पार्क येथे असलेल्या उद्यान गणेश मंदिराजवळ पंडाल घालण्यात आला आहे. याच ठिकाणी आत दुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या उत्सवाच्या दरम्यान रोज देवीची पूजा येथे होते. 45 मिनिटे ही पूजा चालते. या वेळी शंखनाद, बंगाली ढोल वाजवले जातात. अष्टमी आणि नवमीच्या दिवशी विशेष पूजा केली जाते. कुमारी पूजा, सिंदूर उत्सव येथे पार पडतात तसेच धुनूची नाच अर्थात धूप हाती घेऊन नृत्य केले जाते. पूजेच्या वेळी संपूर्ण पंडाल धूप लावली जाते. देवीची बंगाली आरती गायली जाते.
गुगल मॅपवरून साभार
कोलकाताच्या माँ कालीचे घ्या वर्ध्यात दर्शन; 10 लाख खर्चून साकारली प्रतिकृती
देवीला नैवेद्य काय असतो? देवीला खिचडी, फळं, गोड पदार्थाचे नैवेद्य दाखवले जाते. तो प्रसाद पूजेनंतर भाविकांना दिला जातो.‘यावर्षी बंगाल क्लबचे 100 वे वर्ष आहे आणि त्यामुळे हा उत्सव खूप आनंदाने आम्ही साजरा करत आहोत. 10 हजार चौरस फुटावर हा मंडप उभारण्यात आला आहे व पावसामुळे कुठलीही हानी सुशोभीकरणाला होणार नाही यासाठी मंडप फायबरचा आहे. तसेच येथील संपूर्ण देखावा कला दिगदर्शक नितीन देसाई यांनी साकारलेला आहे,’ अशी माहिती बंगाल क्लबचे सदस्य जॉय चक्रबोर्ती यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.