जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : कोलकाताच्या माँ कालीचे घ्या वर्ध्यात दर्शन; 10 लाख खर्चून साकारली प्रतिकृती

Video : कोलकाताच्या माँ कालीचे घ्या वर्ध्यात दर्शन; 10 लाख खर्चून साकारली प्रतिकृती

Video : कोलकाताच्या माँ कालीचे घ्या वर्ध्यात दर्शन; 10 लाख खर्चून साकारली प्रतिकृती

देवीसमोर दुर्गा उत्सव मंडळाने कोलकाता येथील माँ काली दक्षिणेश्वर मंदिराची प्रतिकृती तयार केली आहे. हा भव्य देखावा पाहण्यासाठी भक्तांची गर्दी होत आहे.

  • -MIN READ Wardha,Wardha,Maharashtra
  • Last Updated :

    वर्धा, 28 सप्टेंबर : शारदीय नवरात्र उत्सवास घटस्थापनेपासून प्रारंभ झाला आहे. यंदा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अनेक मंडळांनी देवीसमोर आकर्षक देखावे उभारले आहेत. शहरातील जिल्हा परिषद मैदानात देवीसमोर दुर्गा उत्सव मंडळाने कोलकाता येथील माँ काली दक्षिणेश्वर मंदिराची प्रतिकृती तयार केली आहे. हा भव्य देखावा पाहण्यासाठी भक्तांची गर्दी होत आहे.   पवित्र नवरात्रीचा सण सुरू झाला आहे. शहरातील मंडळांनी देवीची स्थापना करून दरबार सजवला आहे. या सजावटीसाठी मंडळे मोठी मेहनत घेतात. पुलगाव येथील जिल्हा परिषद मैदानात माता राणी दुर्गा उत्सव मंडळाने महिनाभर तयार करून आकर्षक देखावा तयार केला आहे. यंदाच्या देखाव्यात मंडळाने कोलकाता येथील माँ काली दक्षिणेश्वर मंदिराची प्रतिकृती उभारली आहे.  70 फूट लांबीचा भव्य पंडाल  देखावा उभारण्यासाठी कामगार देखील कोलकाता आणि मुर्शिदाबाद वरून  बोलवण्यात आले होते. सुमारे वीस कुशल कारागीर खास सजावटीसाठी वर्ध्यात आले होते. 30 फूट रुंद आणि 70 फूट लांबीचा असा भव्य पंडाल तयार  केला आहे. यामध्ये कोलकाता येथील दक्षिणेश्वर मंदिराचा देखावा उभारण्यात आला आहे. यासाठी जवळपास 8 ते 10 लाखांचा खर्च आल्याचे मंडळ व्यवस्थापकांनी सांगितले.    माँ कालीने विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांना दर्शन दिले होते, असे मानले जाते. कोलकता येथील देवीच्या मंदिरासोबतच रामकृष्ण परमहंस यांची खोली आहे. त्यांचा पलंग आणि इतर स्मृतीही ठेवण्यात आल्या आहेत. मंदिराच्या वटवृक्षाखाली राणी रासमणी आणि परमहंस यांची पत्नी शारदा माता यांची समाधी आहे. याच वटवृक्षाखाली परमहंस ध्यान धारणा  करीत होते, असे सांगितले जाते. हजार पाकळ्यांचे कमळ मंदिरात देवीची मूर्ती ठेवण्यासाठी कमळाचे फूल असून ते फूल चांदीचे आहे. या कमळाला हजार पाकळ्या आहेत. माँ कालीची मूर्ती शास्त्रोक्त शिवाच्या वर उभी करण्यात आली आहे. चेहरा काळ्या दगडांचा आहे. हात, जीभ आणि दात सोन्याने मढवलेले आहेत. Video : सौंदर्याचा खजिना ‘कास पठार’ फुलले, निसर्ग वाचवण्यासाठी पहिल्यांदाच खास उपाय विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन उत्सवादरम्यान विविध प्रकारचे जागरण, गरबा, पूजन, होम हवन, महाप्रसादाचे आयोजन आहे. संपूर्ण गावात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दसऱ्याला सोने दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी अनेक देवीचे विसर्जन केले जाते. नवरात्रीमध्ये माता राणीची स्थापना स्वयंभू अनेक भक्तांकडून केली जाते.   Video : व्हीआयपी, लकी क्रमांक महागले, ‘या’ नंबरसाठी मोजावे लागतील 6 लाख 20 मंडळांमध्ये दुर्गामूर्तीची स्थापना नवरात्रीचा पवित्र सण पुलगाव सोबत नाचणगावात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. येथे सुमारे 20 मंडळामध्ये मातेची स्थापना केली जाते. मातेच्या बहुतेक मूर्ती यवतमाळ आणि कोलकाता येथून आणल्या जातात. प्रसिद्ध बाजार चौक, दुर्गा मंडळ बसस्थानक, दुर्गा मंडल, सिद्धेश्वर दुर्गा मंडळ, माता दुर्गा मंडळ, खाटीकपुरा दुर्गा मंडळ आणि अनेक ठिकाणी माता राणीच्या मूर्तीची मोठ्या श्रद्धेने स्थापना केली जाते.  

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात