नाशिक 4 ऑक्टोंबर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा यंदा बुधवारी (5 ऑक्टोबर) आहे. सत्याचा असत्यावरील विजय साजरा करण्याचा दिवस म्हणजे दसरा. त्यामुळे याचे विजयादशमी असेही नाव आहे. याच दिवशी नवरात्रातील नऊ दिवस आपण देवीची पूजा करतो. ही पूजा याच दिवशी पूर्ण होते. ही पूजा पूर्ण झाल्यानंतर देवीची तेजात्मक शक्ती आपल्याला मिळते, असं मानलं जातं. दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांचं विशेष महत्त्व आहे. त्या दिवशी शस्त्रपूजन देखील केले जाते. ही प्रथा कशी सुरू झाली? यंदा दसऱ्याच्या पूजेचा शूभ मुहूर्त कोणता आहे? याची माहिती धर्म अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी दिली आहे. आपट्यांच्या पानांना महत्त्व का? श्रीरामांचा जन्म रघुकुलात झाला. रघकुलातील श्रीरामांच्या पूर्वजांनी खूप संपत्ती कमावली. ती त्यांनी दान देखील केली. त्यानंतर त्यांनी वानप्रस्थ आश्रम स्विकारला. हे राजे जंगलात राहत असताना त्यांचे कुलगुरू कौत्स मूनी तिथं आले. त्यांनी त्या राजांकडे 14 कोटी सुवर्ण मुद्रा दान म्हणून मागितली. वास्तविक ते राजे तेव्हा वानप्रस्थ आश्रमात होते. त्यांच्याकडे एक रूपया देखील नव्हता. तरीही गुरूंची मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी इंद्राला युद्धाचं आव्हान दिलं. त्या युद्धात इंद्राचा पराभव झाला. त्यानंतर त्या राजांनी मला तुमचं राज्य नको, 14 कोटी सुवर्ण मुद्रा हव्या आहेत अशी मागणी इंद्राकडे केली. तेव्हा इंद्रानी पृथ्वीवरील आपट्याच्या झाडावर आम्ही सुवर्ण मुद्रा सोडतो. त्या तुम्ही वेचून घ्या, असे सांगितले. त्याप्रमाणे भगवान इंद्रानी आपट्याच्या पानांच्या रूपाने सुवर्ण वर्षाव केला. त्यामुळे आपट्याचे पान आपण विजयदशमीला लुटतो.आणि ते सुवर्णाचे प्रतिक आहे, अशी अख्यायिका सांगितली जाते अशी प्रतिक्रिया डॉ. नरेंद्र भारणे यांनी दिली आहे. घरासाठी घेतलेल्या जागेवर का उभे राहिले सारसबागेचे महालक्ष्मी मंदिर? Video शस्त्र पूजेला विशेष महत्त्व दसऱ्याची दिवशी शस्त्रांचे पूजन केले जाते. या दिवशी केलेले शस्त्रपूजन आपल्याला कायमस्वरूपी यश आणि विजय देणारे ठरते, अशी श्रद्धा आहे. त्याचबरोबर या दिवशी बुद्धीची देवता म्हणून माता सरस्वतीची पूजा केली जाते. सोनं खरेदी का? दसऱ्याच्या दिवशी सोन खरेदी केलं तर ते उत्तरोत्तर वाढत जातं,ते कधीच विकायची वेळ येत नाही.असं शास्त्रात सांगितलं आहे. त्यामुळे सुवर्ण,समृध्दी आणि आनंद देणारा हा सण आहे. दसरा आणि विजयादशमी दोघांमध्ये फरक काय? यामागची रंजक कथा तुम्हाला माहितीय? या मुहूर्तावर करा पुजा 5 ऑक्टोंबरला साधारण 2 वाजता पूजेचा मुहूर्त आहे. त्यामुळे दुपारी 2 नंतर पूजा करू शकता, असे डॉ. भारणे यांनी सांगितले आहे. या वेळेला सिमोल्लंघन करतात. अशुभ विचारांचे सिमोल्लंघन करावे आणि शुभ विचार वाढावे. वाईट विचार काढून टाकून चांगल्या गोष्टींची सुरुवात करण्यासाठी दसरा हा चांगला दिवस असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.