मुंबई 26 जुलै : शिवसेना आमदारांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांचं बंड हा शिवसेनेसाठी मोठा धक्का होता. दरम्यान सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देत बंडखोरांवर सडकून टीका केली. यावर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता तुम्ही शिवसेनाप्रमुख होणार का? प्रश्नावर बंडखोर आमदार शिरसाट संतापले, उद्धव ठाकरेंवरच भडकले संदीप देशपांडे म्हणाले, की ही मुलाखत मी पाहिली. यांनी अडीच वर्ष संपत्ती कमावली आता सिम्पथी कमवत आहेत. नियतीची चक्रं फिरत असतात. मनसेचे नगरसेवक फोडले तेव्हा अमित ठाकरे आजारी होते, तेव्हा राज ठाकरेही आजारी होते. आता तुम्ही आजारी असताना तुमचे आमदार फुटले, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. पुढे ते म्हणाले, की बाळासाहेब हे सर्वांचे आहेत, कुणा एकट्याचे नाहीत. आजची मुलाखत म्हणजेच आपलेच प्रश्न आणि आपलीच उत्तर असा प्रकार होता. सर्व घरचा मामला होता. उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना पालापाचोळ्याची उपमा दिली होती. यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की हा पालापाचोळा आधी घट्ट होता. ‘शिवसेनाप्रमुख ही तुमची प्रॉपर्टी नाही’ बंडखोर आमदार संजय शिरसाठांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार पुढे संदीप देशपांडे म्हणाले, की तुम्ही लोकांच्या बाबतीत कपट कारस्थान रचलं. तेच आज तुमच्या बाबतीतही होत आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना मिळालेल्या पुरस्कारावरही त्यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, ज्या संस्थेने हा पुरस्कार दिला ती संस्था कोणती? याच्याआधी त्यांनी कोणता सर्वे केलेला? आपणच आपल्या संस्था उभ्या करायच्या आणि बेस्ट सीएम पुरस्कार घ्यायचा, असा आरोपही त्यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.