जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'शिवसेनाप्रमुख ही तुमची प्रॉपर्टी नाही' बंडखोर आमदार संजय शिरसाठांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

'शिवसेनाप्रमुख ही तुमची प्रॉपर्टी नाही' बंडखोर आमदार संजय शिरसाठांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

 शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा होऊ शकत नाही. आम्हाला शिवसेनाप्रमुख व्हायचं नाही. त्यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा होऊ शकत नाही. आम्हाला शिवसेनाप्रमुख व्हायचं नाही. त्यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा होऊ शकत नाही. आम्हाला शिवसेनाप्रमुख व्हायचं नाही. त्यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 जुलै :  ‘एका दर्जेवर गेलेला मोठा नेत्याला खाली खेचू नका. बाळासाहेबांनी कधी शिवाजी महाराजांना नमस्कार केल्याशिवाय सभा सुरू केली नाही. शिवसेनाप्रमुख ही तुमची प्रॉपर्टी नाही. हे प्रत्येक शिवसैनिकाचे दैवत्त आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, बाळासाहेबांना खुजे करू नका’ असं म्हणत शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उत्तर दिलं. शिंदे गटाने बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. या सगळ्या भूकंपानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीतून आपल्या रोखठोक बाजू मांडली. या मुलाखतीमुळे शिंदे गटामध्ये खळबळ उडाली आहे. आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट उद्धव ठाकरेंनाच उत्तर दिलं. ‘आम्ही कसे श्रेष्ठ हे दाखवण्याच्या प्रयत्न केला आहे.  वाईट वाटलं पालापाचोळा म्हटल्यावर आहे. काम संपलं म्हणून उचलून कचऱ्यात टाकलं असं म्हणण किती योग्य? या गळालेल्या पालापाचोळ्याचं खतही तयार होतं.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हे आमच्यासाठी खूप मोठे आहे. त्यांच्या पुणाईमुळे आम्ही आमदार, खासदार झालो आहोत. तुम्हाला राजकारण करायचे आहे तर बाळासाहेबांचं वापर कशाला करता.  एका दर्जेवर गेलेला मोठा नेत्याला खाली खेचू नका. बाळासाहेबांनी कधी शिवाजी महाराजांना नमस्कार केल्याशिवाय सभा सुरू केली नाही. शिवसेनाप्रमुख ही तुमची प्रॉपर्टी नाही. हे प्रत्येक शिवसैनिकाचे दैवत्त आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, बाळासाहेबांना खुजे करू नका, असं शिरसाट म्हणाले. ‘जी पानं गळाली आहे, त्यांचा अपमान करू नका. मनोहर जोशी तुमच्याजवळ कधी दिसला नाही. ढाके कधी दिसत नाही. काळ बदलत जातो, नवीन माणसं आली आहे, ती स्वीकारा, पालापाचोळा कसं म्हणू शकता. ढाके, मनोहर जोशी, शरद आसारे कधी शिवसेनेचे पान नव्हते का? शिवसेनेच्या नेत्यांनी खेड्यापाड्यात जाऊन काम केले आहे. आम्ही आयुष्य या पक्षात घालवली आहे. 38 वर्ष या पक्षात घालवली आहे, आम्हाला पालापाचोळा म्हणताय, उद्या तुम्हाला कुणी म्हटलं तर काय होईल, असा संतप्त सवाल शिरसाटांनी केला. ( ललित मोदींनी पोस्ट शेअर करत ट्रोलर्सना सुनावले खडेबोल, म्हणाले… ) ‘उद्धव ठाकरे यांनी आजारी असताना बंडाची हालचाल सुरू होती, याबद्दल जे बोलले ते चुकीचे आहे. उद्धव ठाकरे आजारी असताना त्यावेळी बैठका झाल्या नाही. वर्षभरापासून हे सुरू होतं. उद्धव ठाकरे आजारी होते, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी यज्ञ केले होते, असंही शिरसाट म्हणाले. आम्ही कोणत्या पक्षात जाणार आहोत, याबद्दल चिंता करू नका, आम्ही आमचं काय ते पाहू ना.  दर वेळा कुणाच्या बहुमत घेऊन आपण सत्तेत आलो आहोत. हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे आम्ही सपा, एमआयएममध्ये जाणार याचा विचार करू नका, आम्हाला कुठे जायचे तिथे आम्ही जाणार आहोत, असं उत्तरही शिरसाट यांनी दिलं. संजय राऊत यांनी खोडा घातला आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं सख्य कधी पाहिलं नाही. संजय राऊत सारखा माणूस गेला आणि त्याने जुळवाजुळव केली, त्यामुळे आजही अवस्था झाली. त्यामुळे आम्ही सगळे बाहेर पडलो. उद्धव ठाकरेंना कसा राग येईल, शरद पवार कसे जवळ येतील, हे असं घडवून आणलं आहे, अशी टीका शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर केली. शरद पवार हे मोठे नेते आहे, त्यांच्याबद्दल मला बोलण्याचं नाही. पण ज्यांनी जर त्यांनी हे केले असले तर दुर्दैव म्हणावे लागेल. राजकारणामध्ये चमत्कार घडवणार असा शरद पवार नेता आहे. पण, संजय राऊत हे जादूटोणा करणारे आणि काळा दोरा आहे, अशी टीका शिरसाट यांनी केली. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा होऊ शकत नाही. आम्हाला शिवसेनाप्रमुख व्हायचं नाही. त्यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. शिवसेनाप्रमुख हे शिवसेनाप्रमुख आहे. त्यांच्या पायाजवळ राहू, आम्हाला शिवसेनाप्रमुख व्हायची गरज नाही. आमची लायकी नाही. आम्ही त्यांची बरोबर करू शकत नाही, आज त्यांचा आशिर्वाद जरी घेतला तरी खूप झालंय. एक वेळ तुम्हाला विसरू पण शिवसेनाप्रमुखांना विसरू शकत नाही, असं शिरसाट म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात