जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'एक नेता, एक झेंडा, एक मैदान...'; शिंदेंपाठोपाठ ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर समोर

'एक नेता, एक झेंडा, एक मैदान...'; शिंदेंपाठोपाठ ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर समोर

'एक नेता, एक झेंडा, एक मैदान...'; शिंदेंपाठोपाठ ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर समोर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने दसरा मेळाव्यासाठीचा आपला पहिला टीझर कालच प्रदर्शित केला होता. यानंतर आता ठाकरे गटाचा पहिला टीझर समोर आला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 30 सप्टेंबर : शिवसेना कोणाची? यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात न्यायालयीन लढाई सुरू असतानाच मुंबईत ऐतिहासिक दसरा मेळावा साजरा होणार आहे. या मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शनासाठी दोन्ही गटांची तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने दसरा मेळाव्यासाठीचा आपला पहिला टीझर कालच प्रदर्शित केला होता. यानंतर आता ठाकरे गटाचा पहिला टीझर समोर आला आहे. एक नेता…एक पक्ष…एक विचार…एक लव्य…एक नाथ, शिंदेंच्या दसरा मेळाव्याचा पहिला टिझर ‘एक नेता, एक झेंडा, एक मैदान…शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!’ असं कॅप्शन देत हा टीझर शेअर करण्यात आला आहे. दसरा मेळाव्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना ही टीझर लॉन्च झाला आहे. निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार, असं या टीझरमध्ये म्हणण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे ज्या स्टाईलने भाषणाची सुरुवात करतात तेही दाखवण्यात आलं आहे.

जाहिरात

5 ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेकडूनही जोरदार तयारी सुरू आहे. मुंबईच्या बीकेसी मैदानामध्ये शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. याआधी गुरुवारी शिंदे गटानेही मेळाव्याचं पहिलं पोस्टर आणि टिझर प्रदर्शित केलं होतं. या पोस्टरला एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ असं कॅप्शन देण्यात आलं होतं. सोबतच या पोस्टरमध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो वापरण्यात आला आहे. राजकीय वादात मुंबईकरांचे हाल? दसरा मेळाव्यादिवशी वाहतूक कोंडीची शक्यता, दोन्ही गटांकडून हजारो बस आरक्षित 5 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता वांद्र्याच्या बीकेसी मैदानामध्ये शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला सुरूवात होणार आहे. याचवेळी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवर होईल. या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने तीन हजार, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने 1400 खासगी बस आरक्षित केल्या आहेत. यामुळे यंदाचा दसरा मेळावा अतिशय मोठा होणार असून बस मालकांची दिवाळी होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात