जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राजकीय वादात मुंबईकरांचे हाल? दसरा मेळाव्यादिवशी वाहतूक कोंडीची शक्यता, दोन्ही गटांकडून हजारो बस आरक्षित

राजकीय वादात मुंबईकरांचे हाल? दसरा मेळाव्यादिवशी वाहतूक कोंडीची शक्यता, दोन्ही गटांकडून हजारो बस आरक्षित

राजकीय वादात मुंबईकरांचे हाल? दसरा मेळाव्यादिवशी वाहतूक कोंडीची शक्यता, दोन्ही गटांकडून हजारो बस आरक्षित

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने तीन हजार, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने 1400 खासगी बस आरक्षित केल्या आहेत. यामुळे यंदाचा दसरा मेळावा अतिशय मोठा होणार असून मुंबईकरांना मात्र वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागू शकतं

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 30 सप्टेंबर: शिवसेना कोणाची? यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात न्यायालयीन लढाई सुरू असतानाच मुंबईत ऐतिहासिक दसरा मेळावा साजरा होणार आहे. या मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शनासाठी दोन्ही गटांची तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा बेकीसी मैदानार होणार आहे. दरम्यान या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने तीन हजार, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने 1400 खासगी बस आरक्षित केल्या आहेत. यामुळे यंदाचा दसरा मेळावा अतिशय मोठा होणार असून बस मालकांची दिवाळी होणार आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकही उत्सुक असतात. मात्र यंदाचा दसरा मेळावा काहीसा वेगळा असणार आहे. कारण शिवसेनेत दोन गट आहेत. दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्यात शक्तिप्रदर्शन करून आपणच मूळ शिवसेना असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न होणार आहे. Rashmi Thackeray Thane : रश्मी ठाकरे ठाण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रीया म्हणाले मुंबई महानगर प्रदेशासह पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ, खान्देश येथून मुंबईत येण्यासाठी खासगी बसगाड्यांचं आरक्षण करण्यात आलं असल्याची माहिती राज्यातील खासगी बस मालकांनी दिली आहे. मुंबईत दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच बुधवारी दुपारपर्यंत या गाड्या पोहोचतील. 500 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या ठिकाणांवरील गाड्या मंगळवारी रात्रीच मुंबईच्या दिशेने रवाना होतील आणि बुधवारी याठिकाणी पोहोचतील. तर मुंबई महानगर प्रदेशातील वाहनं बुधवारी सकाळी नियोजित सभास्थळासाठी रवाना होतील. मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार? मुंबई शहरात पार्किंगची मोठी समस्या आहे. त्यातच एकाच दिवशी हजारो बस मुंबईत दाखल होणार असल्याने दसऱ्याला प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची भीती आहे. यामुळे नियोजित सभास्थळापासून थोड्या दूर अंतरावर या गाड्या उभ्या राहतील. सभा संपताच गंतव्य स्थानासाठी या गाड्या रवाना होतील, असं खासगी बस चालकांनी सांगितलं आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची खूर्ची मिळणार का? सोनिया गांधींना भेटल्यानंतर सचिन पायलट म्हणाले… समोर आलेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्हा, नागपूर जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्यामधूनही शिंदे गटाकडून ट्रॅव्हल बुक केल्या गेल्या आहेत. चार ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता जिल्ह्यांतील तालुक्यातून या ट्रॅव्हल्स निघणार आहेत. प्रत्येक ट्रॅव्हल्समध्ये 50 शिवसैनिक असतील. प्रवासात जेवण आणि इतर सर्व सोयीसुविधाही पुरवल्या जातील. 5 ऑक्टोबर दुपारी तीनपर्यंत हे सर्व मैदानावर पोहोचतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात