मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Director Abhijeet Deshpande : 'ज्यांना बादलीभर इतिहास माहितीये त्यांना...', हर हर महादेवच्या दिग्दर्शकाचा संभाजी ब्रिगेड-आव्हाडांवर निशाणा

Director Abhijeet Deshpande : 'ज्यांना बादलीभर इतिहास माहितीये त्यांना...', हर हर महादेवच्या दिग्दर्शकाचा संभाजी ब्रिगेड-आव्हाडांवर निशाणा

जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हर हर महादेवचे शो बंद पाडल्याने नवा वाद समोर आला आहे. यावरून दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी या चित्रपटावर झालेल्या वादावर भाष्य केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हर हर महादेवचे शो बंद पाडल्याने नवा वाद समोर आला आहे. यावरून दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी या चित्रपटावर झालेल्या वादावर भाष्य केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हर हर महादेवचे शो बंद पाडल्याने नवा वाद समोर आला आहे. यावरून दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी या चित्रपटावर झालेल्या वादावर भाष्य केले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 08 नोव्हेंबर : संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयावर चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शकांवर ताशेरे ओढत चुकीचा इतिहास दाखवणाऱ्या दिग्दर्शकांना थेट इशारा दिला. दरम्यान यावरून राज्यात राजकारण पेटल्याचे दिसून येत आहे. हर हर महादेव या चित्रपटाचे काल राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शो बंद पाडल्याने नवा वाद समोर आला आहे. यावरून दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी या चित्रपटावर झालेल्या वादावर भाष्य केले आहे.

देशपांडे यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, ज्यांना बादली भर इतिहास माहितीये त्यांना हा चित्रपट काय कळणार आहे? या चित्रपटावर छत्रपती संभाजी महाराज आणि उदयनराजे यांनी आक्षेप घेतला आहे. दरम्यान मी दोन्ही राजेंना हा चित्रपट दाखवणार असल्याचे देशपांडे म्हणाले. मी हा चित्रपट बनवत असताना सर्व ऐतिहासीक दाखल्यांसह हा चित्रपट बनवला आहे. यामुळे बादलीभर इतिहास घेऊन येत कोणताही आक्षेप घेत चित्रपट बंद पाडणे योग्य नसल्याचे देशपांडे म्हणाले.

हे ही वाचा : जितेंद्र आव्हाडांच्या आंदोलनाला मनसेचं 'हाऊसफूल' प्रत्युत्तर, ठाण्यात 'हर हर महादेव'ला तुफान गर्दी

या सिनेमात ज्या ज्या मुद्द्यांवर आक्षेप घेतला जातोय ते मुद्दे आम्हाला सेन्सॉर बोर्डाने विचारले होते. तेव्हा आम्ही त्यासंबंधी सगळे दस्ताऐवज सेन्सॉर बोर्डाला सबमिट केले गेले आणि त्यानंतर सेन्सॉरनं ते मान्य केलं.  म्हणून आम्हाला या विषयी काहीच बोलायचं नाहीये.  तसंच सिनेमा न पाहताच आक्षेप घेतला जातोय,असही अभिजीत देशपांडे यांनी म्हटलं आहे.

तुम्हाला कोणता सीन पटला नाही पटला यावर आपण डिबेट करू शकतो.  तुम्हाला सिनेमातील कोणते फॅक्ट्स पटले नाही त्यावर आपण कोर्टात जाऊन समोरासमोर बोलू शकतो. पण असं थिएटरमध्ये जाऊन तुम्ही मारामारी करताय हे किती चुकीचं आहे यावर तुम्ही विचार करा.  ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण स्वत: ला भक्त म्हणवतो.

ज्या महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र आणलं आपल्या सगळ्यांना माणूसकीचा संदेश दिला. आणि आपण त्या व्यक्तीच्या कुटुंबासमोर त्याला जाऊन मारहाण करतो तेव्हा आपण छत्रपतींचा किती अपमान करतो हे पाहावं आणि त्यासाठी महाराजांची आणि संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी, असं अभिजीत देशपांडे म्हणालेत.

अभिजीत देशपांडे यांचे आवाहन

इतिहासाची मोड तोडून शिवाजी महाराजांवरचे सिनेमे तयार केले जात असल्याचा आरोप करत हर हर महादेव या सिनेमावर आक्षेप घेण्यात आला. कालपासून पुणे त्यानंतर ठाण्यात हर हर महादेव सिनेमाचे शो बंद पाडण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये जाऊन प्रेक्षकांना थिएटर बाहेर काढलं. तसंच प्रेक्षकांनी सिनेमा पाहू नये असं आवाहन देखील केलं.

हे ही वाचा : 'निर्मात्यांनो, इकडं लक्ष द्या!' ऐतिहासिक चित्रपटाबाबत कोल्हापूरकरांनी केली मागणी, Video

इतिसाहाची मोड तोड करून सिनेमा तयार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान यावेळी प्रेक्षकांना मारहाण झाल्याचा आरोप हर हर महादेव सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी केला आहे.त्याचप्रमाणे प्रेक्षकांना मारहाण करणाऱ्यांनी महाराष्ट्राची आणि प्रेक्षकांची माफी मागावी अशी मागणी देखील अभिजीत देशपांडे यांनी केली आहे.

First published:
top videos

    Tags: Jitendra awhad, Movie review, Sambhajiraje chhatrapati, Udayanraje bhosale