ठाणे, 8 नोव्हेंबर : हर हर महादेव या चित्रपटावरून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वाद सुरू आहेत. पुण्यात संभाजी ब्रिगेडने तर ठाण्यात जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने हर हर महादेव या चित्रपटाचे शो बंद केले. ठाण्यामध्ये सोमवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून चित्रपट पाहायला आलेल्या व्यक्तीला मारहाणही करण्यात आली. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आंदोलनानंतर मनसे आक्रमक झाली आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी ज्या व्हिव्हियाना मॉलमध्ये काल राष्ट्रवादीने आंदोलन केलं तिकडेच हर हर महादेवच्या फ्री शोचं आयोजन केलं. मनसेच्या या फ्री शोला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. प्रेक्षकांची गर्दी बघता अविनाश जाधव यांनी एकऐवजी आता तीन शो बूक केले आहेत. ‘जे काल घडलं त्याचा विरोध करायला लोक इकडे आली आहेत. जितेंद्र आव्हाड प्रेक्षकांसोबत जे काही वागले ते प्रेक्षकांना आवडलं नाही. महाराजांचा चित्रपट बंद करण्याचा अवमान त्यांनी केला आहे. तुम्ही प्रेक्षकाला मारलं का? त्याला मारायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?’ असा सवाल अविनाश जाधव यांनी विचारला. ‘हर हर महादेव’ वादात मनसे कार्यकर्त्याला NCP कडून खळ्ळ-खट्याक, राज ठाकरे संतापले ‘जितेंद्र आव्हाड यांचा आक्षेप वेगळा आहे. महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला, हा त्यांचा आक्षेप आहे, त्यांना त्याचं दु:ख आहे. तो इतिहास त्यांना आवडला नसेल,’ असा आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे.
ठाण्यात मनसेचं 'हर हर महादेव'! जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसह विवियाना मॉलमधल्या थिएटरमध्ये चित्रपटाविरोधात केलेल्या हिंसक आंदोलनाला उत्तर म्हणून मनसेने या सिनेमाचा फ्री शो आयोजित केला आणि ठाण्यात काय परिस्थिती झाली पाहा... #MaharashtraPolitics #MNS #HarHarMahadev pic.twitter.com/zDdRbf5qzM
— News18Lokmat (@News18lokmat) November 8, 2022
प्रेक्षकांना मारहाण करणाऱ्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी; हर हर महादेवच्या दिग्दर्शकाची मागणी गुन्हा दाखल जितेंद्र आव्हाड यांच्या 100 कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले आहे. 141,143,146,149,323,504, मुंबई पोलीस कायदा कलम 37/135 इत्यादी कलम लावण्यात आले आहेत. फिर्यादी प्रेक्षक विजय दुर्वे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सिनेमा बंद पाडल्यामुळे दुर्वे यांनी तिकीटाचे पैसे मागितले होते. दुर्वे हे मनसेचे कार्यकर्ते आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये वाद निर्माण झाला.