Home /News /maharashtra /

Mumbai Police : आमदारांच्या संरक्षणात असलेले पोलीस आहेत तरी कुठे? गुवाहाटी की मुंबई ?

Mumbai Police : आमदारांच्या संरक्षणात असलेले पोलीस आहेत तरी कुठे? गुवाहाटी की मुंबई ?

आमदारांनी बंडखोरी केली त्या आमदारांचे पोलीस आहेत तरी कुठे हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. हे पोलीस बंडखोर आमदारांसोबत गुवाहाटीला गेले का? (Mumbai police protection department)

  मुंबई, 25 जून : एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी शिवसेनेसोबत (shiv sena) बंड करत जवळपास 50 आमदारांना सुरत मार्गे गुवाहाटीला )surat and guwahati) रवाना झाले. दरम्यान त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना पोलीस संरक्षण (mla police protection) देण्यात येते. ज्या आमदारांनी बंडखोरी केली त्या आमदारांचे पोलीस आहेत तरी कुठे हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. हे पोलीस बंडखोर आमदारांसोबत गुवाहाटीला गेले का? कि ते मुंबईत (Mumbai police) थांबले यावर मुंबईतील 'प्रोटेक्शन' विभागातील (Mumbai police protection department) एका अधिकाऱ्याने याबाबत दैनिक पुढारीशी बोलताना माहिती दिली. 

  एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काहीही कळू न देता 20 जूनला सुरतला पलायन करत त्यांनी गुवाहाटी गाठले. या बंडखोरांमध्ये काही मंत्री देखील आहेत. या सर्व आमदारांना प्रत्येकी एक पोलीस संरक्षण होते. मुंबईतील आमदारांना पोलिसांच्या संरक्षण विभागामार्फत, तर ग्रामीण भागातील आमदारांना पोलीस अधीक्षक कार्यालय किंवा पोलीस आयुक्तालयामार्फत पोलीस संरक्षण दिले होते. एक पोलीस कर्मचारी आमदारांसोबत सतत असतो.

  हे ही वाचा : 'मी मागून वार करणारा नाही'; आमदारांच्या बंडामागे हात असल्याच्या आरोपावर उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

  विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर सुरतेला जाण्यापूर्वी शिंदे समर्थक आमदारांनी मुंबईतच पोलीस संरक्षण सोडले होते. आमदारांच्या या कृतीमुळे संबंधित पोलिसांच्या नोकऱ्या बचावल्या आहेत; शिवाय गृह खात्यावरील संशयही दूर झाला आहे. दरम्यान बंडखोर आमदारांसोबत सध्या महाराष्ट्रातील कोणताही पोलीस नसल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे गृहखात्याचा मोठा संशय दूर झाला आहे.

  मुंबई 'प्रोटेक्शन' विभागातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आमच्या विभागाकडून संबंधित आमदारांना संरक्षण दिले असले तरी त्याचा किती वापर करायचा हे त्या आमदारावर अवलंबून असते. खासगी किंवा वैयक्तिक बैठक तसेच भेट असेल तर आमदार संबंधित पोलीस कर्मचाऱ्यास आपल्यासोबत शक्यतो घेऊन जाणे टाळतात. याबाबत पोलीस कर्मचाऱ्यास सूचना केली जाते. सुरतेला जाण्यापूर्वी आमदारांनी तैनात पोलीस कर्मचाऱ्याला खासगी कार्यक्रमाला जात असल्याचे सांगितले होते. याबाबतची माहिती संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने प्रोटेक्शन विभाग आणि आपल्या वरिष्ठांना दिली आहे. 

  हे ही वाचा : बाबा ‘योगराज’ म्हणत शिवसेनेनं एकनाथ शिंदेंना सुनावलं, भाजपवरही साधला निशाणा

  ग्रामीण भागातील आमदार शक्यतो आपल्यासोबत पोलीस कर्मचारी आणत नसल्याचे आमचे निरीक्षण आहे. आता कालच्या घटनेवेळी ग्रामीण आमदारांसोबत किती पोलीस कर्मचारी होते, ते मुंबईतच राहिले किंवा पुन्हा परत गेले याबाबतची माहिती संबंधित जिल्हा पोलीस कार्यालय देऊ शकतात, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Mla, Mumbai, Mumbai police, Police

  पुढील बातम्या