प्रमोद पाटील (पनवेल), 19 नोव्हेंबर : मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा खिंडीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन दिवसापासून थांबून असलेल्या ऑडी कारमध्ये एक मृतदेह आढळून आला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कर्नाळा खिंड येथे या गाडीत मृतदेह सापडला आहे. याबाबत पनवेल पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत पाहणी सुरू केली आहे. त्यानंतर त्यांनी हा मृतदेह बाहेर काढून फारेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. हा मृतदेह संजय कार्लेचा असल्याचे बोलले जात आहे. सोन्याची बनावट नाणी विकून कार्ले अनेकांची फसवणूक करायचा. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई गोवा महामार्गावर कर्नाळा अभयारण्याजवळ रात्री पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीत तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील आरोपी संजय मारुती कार्ले (रा.अनिकेत अपार्टमेंट, यशवंत नगर, तळेगाव दाभाडे) याचा खून झाला आहे. दरम्यान कार्लेवर तळेगाव - दाभाडे पोलीस स्टेशन येथे 656/2018 भादवि कलम 420, 354,506 व मोक्का अन्वय गुन्हा दाखल आहे. या दाखल गुन्ह्यात नमूद आरोपी हा सहा महिन्यांपूर्वी वैद्यकीय रजेवर मुक्त होता व त्यानंतर त्याला कायमस्वरूपी जामीन मिळाला होता.
हे ही वाचा : धक्कादायक! आधी लग्नाचे आमिष नंतर अत्याचार, धर्मांतरासाठी तरुणीवर दबाव टाकणाऱ्या आरोपीला बेड्या
संजय मारुती कार्लेवर दाखल गुन्ह्यात त्याच्या सोबत असणारे गुन्हेगारांची नावे प्रकाश उर्फ पिंट्या गोपाळ साळवे, महिंद्र गोपाळ साळवे, आकाश प्रकाश साळवे, तेजस प्रकाश साळवे, सिद्धार्थ महेंद्र साळवे, मीनाक्षी प्रकाश साळवे असे आरोपी असून सर्व आरोपी हे जामीनवर मुक्त आहेत.
संजय रमेश कार्ले हा तळेगावमध्ये लपून छपून राहत असे अशी माहिती पुढे आली आहे. डुप्लीकेट गोल्डन कॅाईन देवून लोकांना फसवणूक करण्याच्या प्रकरणी तो सवयीचा गुन्हेगार होता असेही समजते. बंद गाडीत मागच्या सीटखाली मृतदेह कोंबलेल्या अवस्थेत होता. हा मृतदेह संजय कार्लेचा असल्याची माहिती आहे. संजय हा मूळचा पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील रहिवासी आहे.
हे ही वाचा : कोल्हापूर : मुलींचे शाळेत जाणे झाले अचानक बंद, चौकशीतून हादरवणारी माहिती समोर, पालकांचा संताप
सोन्याची बनावट नाणी विकून तो अनेकांची फसवणूक करायचा. संजयवर अनेक गुन्हे दाखल झाल्यानं त्याच्यावर मोक्का लावण्यात आला होता. तो पोलिसांच्या अटकेत ही होता. सहा महिन्यांपूर्वीच तो पॅरोलवर बाहेर आला होता. त्यानंतर त्याच्या हत्येचीच बातमी समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mumbai, Mumbai crime branch, Mumbai News, Murder Mystery, Panvel