मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोल्हापूर : मुलींचे शाळेत जाणे झाले अचानक बंद, चौकशीतून हादरवणारी माहिती समोर, पालकांचा संताप

कोल्हापूर : मुलींचे शाळेत जाणे झाले अचानक बंद, चौकशीतून हादरवणारी माहिती समोर, पालकांचा संताप

प्रातिनिधीक छायाचित्र

प्रातिनिधीक छायाचित्र

कोल्हापूर जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलींनी अचानक शाळेत जाणं बंद केलं. याची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

कोल्हापूर, 19  नोव्हेंबर :  जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील मुलींशी शिक्षकाने असभ्य लैंगिक वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पोर्ले इथल्या शाळेतून ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याचा मुलींनी इतका घसका घेतला की मुली शाळेतच जात नव्हत्या. मुली शाळेत का जात नाही याची चौकशी केली असता चौकशीतून हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. नामदेव पवार असं या प्रकरणात आरोप असलेल्या शिक्षकाचं नाव आहे.

पोर्लेमधील घटना  

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील पोर्लेमध्ये असलेल्या एका शाळेत हा प्रकार घडला आहे. नामदेव पवार असं आरोप असलेल्या या शिक्षकाचं नाव आहे. काही दिवसांपासून मुली शाळेत जात नव्हत्या. मुली शाळेत का जात नाही याची चौकशी केली असता हे प्रकरण समोर आले आहे. या प्रकाराने पालकांना देखील धक्का बसला आहे. या प्रकरणी संभाजी ब्रिगेडकडून संबंधित शाळेच्या मुख्यध्यापकांना जाब विचारण्यात आला आहे. तसेच संबंधित शिक्षकांना बडतर्फ करण्याची मागणी देखील संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

हेही वाचा :  वाईट घडलं, 9 महिन्याची गरोदर महिला तलावावर कपडे धुण्यासाठी गेली आणि...

शिक्षणमंत्रीच पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातील कृत्य

विशेष म्हणजे दीपक केसरकर हे राज्याचे शिक्षण मंत्री आहेत. तसेच ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. शिक्षणमंत्रीच पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातून हे धक्कादायक कृत्य समोर आलं आहे. या प्रकरणात ज्या शिक्षकावर आरोप करण्यात आला आहे, त्या शिक्षकांना बडतर्फ करा अशी मागणी आता करण्यात येत आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Kolhapur