मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /धक्कादायक! आधी लग्नाचे आमिष नंतर अत्याचार, धर्मांतरासाठी तरुणीवर दबाव टाकणाऱ्या आरोपीला बेड्या

धक्कादायक! आधी लग्नाचे आमिष नंतर अत्याचार, धर्मांतरासाठी तरुणीवर दबाव टाकणाऱ्या आरोपीला बेड्या

सध्या देशभरात श्रद्धा वालकर खून प्रकरण गाजत आहे. हे प्रकरण ताजं असतानाच आणखी एक धक्कादायक घटना हिंगोलीमधून समोर आली आहे.

सध्या देशभरात श्रद्धा वालकर खून प्रकरण गाजत आहे. हे प्रकरण ताजं असतानाच आणखी एक धक्कादायक घटना हिंगोलीमधून समोर आली आहे.

सध्या देशभरात श्रद्धा वालकर खून प्रकरण गाजत आहे. हे प्रकरण ताजं असतानाच आणखी एक धक्कादायक घटना हिंगोलीमधून समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Hingoli, India

हिंगोली :  सध्या देशभरात श्रद्धा वालकर खून प्रकरण गाजत आहे. हे प्रकरण ताजं असतानाच आणखी एक धक्कादायक घटना हिंगोलीमधून समोर आली आहे. लिव्हईन रिलेशनशिपमध्ये असलेल्या तरुणीवर धर्मांतराचा दबाव टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढंच नाही तर या तरुणीने धर्मांतराला विरोध केल्यानंतर तीला जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.  साजिद रफीकखाँ पठाण असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. पुढील तपास  सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तरुणीवर अत्याचार  

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी साजिद रफीकखाँ पठाण हा हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथील रहिवासी आहे. आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. त्यानंतर आरोपीने संबंधित तरुणीवर डोंगरकडा, औरंगाबाद, फरीदाबाद , दिल्ली अशा विविध ठिकाणी अत्याचार केले. दोन महिन्यानंतर हे दोघेही डोंगरकडा येथे परत आले. त्यानंतर आरोपी साजिदकडून पीडित युवतीवर धर्मांतरासाठी दबाव आणला गेला व त्यासाठी विरोध केल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली.

हेही वाचा :  कोल्हापूर : मुलींचे शाळेत जाणे झाले अचानक बंद, चौकशीतून हादरवणारी माहिती समोर, पालकांचा संताप

आरोपीविरोधात गुन्हा दाखल  

दरम्यान त्यानंतर या प्रकणी पीडितीने आरोपीविरोधात आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर आखाडा बाळापूर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला काल रात्रीच ताब्यात घेण्यात आलं आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Crime news