Home /News /maharashtra /

वंजारी युवक संघटनेने MPSCच्या कार्यालयात फेकली अंडी, बोर्डाला फसलं काळं

वंजारी युवक संघटनेने MPSCच्या कार्यालयात फेकली अंडी, बोर्डाला फसलं काळं

वंजारी युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी MPSC कार्यालयात जाऊन तीव्र आंदोलन केले. एनटी 'ड' च्या जागा राखीव का ठेवल्या नाहीत, असा सवाल करत वंजारी युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी MPSC च्या कार्यालयात अंडी फेकली.

    मुंबई,2 मार्च:महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ( MPSC) काढण्यात आलेल्या PSI च्या जाहिरातीत धनगर समाजाला अवघ्या 2 जागा तर वंजारी समाजाच्या नशिबी पुन्हा एकदा भोपळा आल्यामुळे धनगर आणि वंजारी समाजाचे विद्यार्थी पुन्हा एकदा MPSC विरोधात आक्रमक झाले आहेत. वंजारी युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी MPSC कार्यालयात जाऊन तीव्र आंदोलन केले. एनटी 'ड' च्या जागा राखीव का ठेवल्या नाहीत, असा सवाल करत वंजारी युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी MPSC च्या कार्यालयात अंडी फेकली. एवढेच नाहीतर अधिकाऱ्यांना काळं फसण्याचा प्रयत्न केला. अधिकारी हाता न आल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी MPSC कार्यालयावरील बोर्डावरच काळं फासत वंजारी समाजाच्या आरक्षित जागा भराव्यात, अशी मागणी केली. काय आहे प्रकरण? MPSCने PSIच्या 650 जागांच्या जाहिरातीमध्ये या दोन्ही प्रवर्गांना पुन्हा एकदा वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. या जाहिरातीमध्ये आरक्षित कोट्यानुसार धनगर समाजाला 24 जागा मिळणे अपेक्षित आहे. पण या जाहिरातीत मिळाल्यात अवघ्या 2 जागा. वंजारी समाजाला तर या जाहिरातीत अक्षरशः शुन्य जागा मिळाल्या आहेत. धनगर, वंजारी समाजावर पुन्हा अन्याय करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. हेही वाचा...PSIच्या जाहिरातीत धनगर समाजाला केवळ 2 जागा तर वंजारी समाजाच्या नशिबी पुन्हा शून्य! PSI च्या जाहिरातीत धनगर समाजाला अवघ्या 2 जागा तर वंजारी समाजाच्या नशिबी पुन्हा एकदा भोपळा आला आहे. यामुळे पुण्यात धनगर आणि वंजारी समाजाचे विद्यार्थी पुन्हा एकदा एमपीएससी विरोधात आक्रमक झाले आहेत. एमपीएससीने पुन्हा एकदा समांतर आरक्षणाच्या आडून वंजारी आणि धनगर समाजाच्या परीक्षार्थींवर पुन्हा एकदा अन्याय केल्याचा गंभीर आरोप होत आहे. शुक्रवारी याच मुद्यावरून पुण्यात या दोन्ही समाजाच्या एमपीएससी परीक्षार्थींनी तीव्र आंदोलन केलं होतं. तेव्हा कुठे समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी ही अन्यायकारक जाहिरात रद्द करायला लावून आंदोलक विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या आरक्षित जागा कसल्याही परिस्थितीत मिळवून देऊ, असं आश्वासन 'न्यूज18 लोकमत'शी बोलताना दिलं. हेही वाचा...पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय.. धनंजय मुंडेंचा भाजपवर निशाणा वंजारी समाजाला आरक्षित कोट्यानुसार किमान 13 जागा मिळणं अपेक्षित आहे. पण सरप्लसच्या नावाखाली एमपीएससीने या समाजाला पीएसआयच्या जाहिरातीत एकही जागा सोडलेली नाही. म्हणूनच वर्षांनुवर्षे एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचे भवितव्य अक्षरशः अंधकारमय बनले आहे. या आंदोलक विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात रोष व्यक्त करतात समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे खडबडून जागे झाले आणि आणि त्यांनी ट्वीट करून आपण आंदोलक विद्यार्थ्यांसोबत असल्याचं त्यांना जाहीर करावं लागलं. हेही वाचा...धक्कादायक! आदिवासी वसतिगृहातील स्वच्छतागृहात 18 वर्षांच्या विद्यार्थिनीची प्रसूती एमपीएससी खरंतर गेल्या चार वर्षांपासून सरप्लसच्या नावाखाली एनटी प्रवर्गाच्या मुलांना त्यांच्या हक्काच्या जागा नाकारत आले आहे. याविरोधात पीडित विद्यार्थी थेट हायकोर्टापर्यंत लढले आणि जिंकलेत देखील पण तरीही एमपीएससीने पुन्हा एकदा समातंर आरक्षणाचं कारण देत एनटी 'सी' आणि एनटी 'डी' प्रवर्गाच्या मुलांवर अन्याय केल्याचं बघायला मिळत आहे. म्हणूनच आता सत्तेत असलेले या समाजाचे मंत्री तरी आपल्या समाजाच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार का, हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या