Home /News /maharashtra /

धक्कादायक! आदिवासी वसतिगृहातील स्वच्छतागृहात 18 वर्षांच्या विद्यार्थिनीची प्रसूती

धक्कादायक! आदिवासी वसतिगृहातील स्वच्छतागृहात 18 वर्षांच्या विद्यार्थिनीची प्रसूती

धुळे येथील महिला वसतिगृहातील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

    धुळे, 2 मार्च : धुळे जिल्ह्यातील साक्री या शहारातील महिला आदिवासी वसतिगृहात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका 18 वर्षांच्या विद्यार्थिनीने वसतिगृहातील स्वच्छतागृहात प्रसूती केली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर वसतिगृहातील गृहपालांवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रसूती केल्यानंतर या विद्यार्थिनीने त्या नवजात बाळाला शाळेच्या भिंतीवर सोडून दिले होते. धुळ्यातील साक्री तालुक्यात सावित्रीबाई फुले आदिवासी मुलींचे वसतिगृह आहे. या वसतिगृहातील ही विद्यार्थिनी आहे. या विद्यार्थिनीने वसतिगृहातील स्वच्छतागृहात एका बाळाला जन्म दिला. ही प्रसूती तिने स्वत:च केल्याचे सांगितले जात आहे. प्रसूती झाल्यानंतर विद्यार्थिनीने नवजात मुलाला शाळेच्या भिंतीवर ठेवले. हे बाळ सापडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वसतिगृहाच्या गृहपालांना निलंबित करण्यात आले आहे. तिला व नवजात बाळाला हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणी खोटी कशी ठरली वसतिगृहातील विद्यार्थिनींची नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते. 2019 च्या नोव्हेंबर महिन्यात या विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्य़ावेळी तिला नियमित मासिक पाळी येत असल्याचे सांगितले जात होते. विद्यार्थिनीच्या अन्य चाचण्यासाठी व्यवस्थित होत्या. मात्र गेल्या नऊ महिन्यात कोणालाच या विद्यार्थिनीच्या गर्भावस्थेबद्दल कशी माहिती मिळाली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वसतिगृह चालक व डॉक्टरांनाही याबाबत संशय आला कसा नाही अशीही शंका उपस्थित केली जात आहे. ही विद्यार्थिनी कृषी विद्यालयात शिक्षण घेत होती. या पीडित विद्यार्थिनीला कोणापासून दिवस गेले, यासंदर्भात कोणी तिच्यावर दबाव आणला होता का यासारखे प्रश्न उपस्थित झाले आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: A girls, Delivery, Dhule, Pregnant, Student

    पुढील बातम्या