Home /News /maharashtra /

संभाजीराजेंनी उघडकीस आणला धक्कादायक प्रकार, रायगडावरील 'रोपवे' वादाच्या भोवऱ्यात

संभाजीराजेंनी उघडकीस आणला धक्कादायक प्रकार, रायगडावरील 'रोपवे' वादाच्या भोवऱ्यात

खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथे पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट केला.

  मुंबई, 29 सप्टेंबर: स्वराज्याची राजधानी अशी जगभरात ओळख असलेल्या किल्ले रायगडवरत उभारण्यात आलेली 'रोप वे' आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ही सेवा बेकायदा असून रोप वे व्यवस्थापनाने खासगी जागेत अतिक्रमण करून रोप वे उभारला असल्याची धक्कादायक बाब रायगड जिल्हा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी उघडकीस आणली आहे. याबाबत खासदार संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. हेही वाचा..राज्यपालांनी केला वनाधिकार अधिनियमात महत्वपूर्ण बदल, अनुसूचित जमातींना दिलासा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी या संदर्भात मंगळवारी रायगड जिल्ह्यातील महाड येथे पत्रकार परिषद घेऊन हा गौप्यस्फोट केला. किल्ले रायगडवर सुरूवातीपासून स्थानिक असलेल्या अवकिरकर या कुटुंबांच्या जागेत दिशाभूल करून रोप वे उभारण्यात आला आहे. गेली 30 वर्षांत रोप वे व्यवस्थापनाने रायगड किल्ला संवर्धनात कसलाही सहभाग घेतलेला नाही. याउलट कायम असहकार्य राहिले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह केंद्र सरकारकडे प्राधिकरणाने तक्रार केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने किल्ले रायगड वरील रोप वे सेवा ही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ओबीसी नेते मुंबईत छत्रपती संभाजी राजे यांच्या भेटीला.... दरम्यान, सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण स्थगित केल्यामुळे मराठा समाज पुन्हा नाराज झाला आहे. मराठा आंदोलन पुन्हा पेटण्याची चिन्ह दिसत आहे. त्यात मराठाविरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांनी खासदार छत्रपती संभाजी राजे यांची भेट घेतली. आपण सर्व जण एक कुटुंब आहोत. सर्वांनी मराठा आरक्षणाला सहकार्य करावे, असे संभाजी राजे यांनी मत व्यक्त केलं. ओबीसी समाजाच्या ज्या चिंता आहेत. त्या ऐकून घेण्याची विनंती हरिभाऊ राठोड यांनी केली. संपूर्ण ओबीसी समाज मराठा समाजसोबत सहकार्याची भावना घेऊन मदत करेल असाही शब्द त्यांनी दिला. त्यांच्या सोबत मुस्लिम, ओबीसी समाजाचे अध्यक्ष युनूस मणियार हे सुद्धा होते. बाराबलुतेदार संघटना आणि कुंभार समाजाचे नेते सुद्धा उपस्थित होते. हेही वाचा...कृषी विधेयकावरून महाविकास आघाडीत वाद? दोन महिन्यांपूर्वीच काढला होता आदेश राजर्षी शाहूंच्या वरसदाराने आमची भूमिका समजून घेतली. संभाजीराजेंनी जी मराठा आरक्षण मागत असताना बहुजन समाजाच्या एकीसाठीची सर्व समावेशी भूमिका घेतली आहे त्यासोबत आम्ही आहोत. असे विधान मुस्लिम ओबीसी नेते युनूस मणियार यांनी सांगितले.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Sandip Parolekar
  First published:

  Tags: Raigad, Raigad fort, Raigad news, Sambhaji raje bhosle, Sambhajiraje chhatrapati, कर्जत raigad

  पुढील बातम्या