Home /News /mumbai /

कृषी विधेयकावरून महाविकास आघाडीत वाद? दोन महिन्यांपूर्वीच काढला होता आदेश

कृषी विधेयकावरून महाविकास आघाडीत वाद? दोन महिन्यांपूर्वीच काढला होता आदेश

पणन संचालनालय कृषी विधेयकाच्या अध्यादेशाबद्दल अंमलबजावणी करण्याचा आदेश काढला होता.

मुंबई, 29 सप्टेंबर : कृषी विधेयकावर देशभरात तीव्र पडसाद उमटत आहे. शेतकरी संघटनांनी ठिकठिकाणी मोदी सरकारच्या या निर्णयाविरोधात आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारनेही कृषी विधेयकाला विरोध दर्शवला आहे. पण, ऑगस्ट महिन्यातच या विधेयकाच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याचा आदेश काढला असल्याचे समोर आले आहे. पणन संचालनालय कृषी विधेयकाच्या अध्यादेशाबद्दल अंमलबजावणी करण्याचा आदेश काढला होता. केंद्र सरकारने काढलेल्या कृषी अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी असा आदेश पणन खात्याने काढला होता. 'ते' नमुने का घेतले नाही? सुशांत सिंह राजपूत प्रकरणी AIIMS हॉस्पिटलचा थेट सवाल या अध्यादेशावर पणन विभागाने 10 ऑगस्टला आदेश काढला होता.  वास्तविक केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी विधेयकाच्या विरोधात भूमिका घेणार असे म्हटले होते. पण विधेयक मंजूर आधीच कृषी विधेयकाच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणी भूमिका राज्यातील  पणन खात्याने घेतली होती. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी पक्षाकडे पणन मंत्रालय असून या विभागाने आदेशाची अंमलबजावणी करणारा अध्यादेश काढला होता. कृषी विधेयकाला काँग्रेसने विरोध केला आहे. पण राष्ट्रवादीच्या खात्यात असलेल्या विभागानेच आदेश काढल्यामुळे महाविकास आघाडीत समन्वय नाही का? असा सवाल उपस्थितीत झाला आहे. आणखी एका निर्भयाचा बळी, नराधमांनी सामूहिक बलात्कार करून पीडितेची जीभ कापली दरम्यान, कृषी विधेयकावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला होता. कृषी विधेयकावर चर्चा करण्याची विरोधकांनी मागणी केली होती. पण, सरकारने घाई-घाईने हे विधेयक आणले. या विधेयकावर चर्चा होणे गरजेचं होतं, असं म्हणत विरोध दर्शवला होता.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या