अमरावती, 15 नोव्हेंबर: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी, लॉकडाऊन (Corona Lockdown) काळात आलेले वीज बिल निम्मे माफ करण्यात यावे आणि तुरुंगात असलेले आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांची सुटका करावी, या मागणीसाठी खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर उतरल्या आहेत.
अमरावतीत (Amaravati) महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून खासदार नवनीत राणा यांच्या रविवारी नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. शहरातील राजकमल चौक येथे नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांसह तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. सरकार विरोधात घोषणाबाजी करत युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा देखील जाळला.
हेही वाचा...सदाभाऊ भाजपला म्हणतात.. 'का रे दुरावा', लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
आमदार रवी राणा यांनी तीन दिवसांपूर्वी मोझरी येथे रास्ता रोको आंदोलन केलं होतं.. रवी राणा यांनी जामीन घेण्यास नकार दिल्याने 20 शेतकऱ्यांसह रवी राणा तीन दिवसांपासून अमरावती कारागृहात आहेत. आमदार राणा कारागृहात असून प्रशासनाने दखल घेतली नसल्याचां आरोप केला. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आज शेतकऱ्यांना घेऊन मुंबई रवाना होणार असून उद्या मातोश्री समोर आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.
पतीच्या सुटकेसाठी नवनीत राणा दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर....@Navneetrana62 pic.twitter.com/kztcptY6Ht
— News18Lokmat (@News18lokmat) November 15, 2020
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीत आंदोलन केल्यानंतर बडनेराचे आमदार रवी राणा यांनी अटक करण्यात आली आहे. त्यांची रवानगी ही कारागृहात करण्यात आली आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांच्या अटकेबद्दल महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून रवी राणा यांच्या अटकेबद्दल ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.'शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी सुद्धा जेलभरो आंदोलन केले. आमदार रवी राणा हे तर आजही दिवाळीच्या दिवशी कारागृहात आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो' असं फडणवीस म्हणाले आहे.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी सुद्धा जेलभरो आंदोलन केले.
शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी व लॉकडाउन काळात आलेली वीज माफ करण्यात यावे या मागणीसाठी शुक्रवारी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी रवी राणा यांच्यासह 110 शेतकरी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी राष्ट्रीय महामार्गावर टायरची जाळपोळ केली यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.
हेही वाचा...पुणेकरांनी केलं कोरोनाविषयक नियमांचं उल्लंघन, महापालिकेनं घेतला मोठा निर्णय
रवी राणांनी जामीन नाकारला
अटक केल्यानंतर रात्री बारा वाजेच्या सुमारास राणा यांच्यासह 20 शेतकऱ्यांना न्यायालयात हजर केले. मात्र आमदार रवी राणा यांनी न्यायालयात जामीन नाकारला. विशेष म्हणजे, न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच रात्री न्यायालय सुरू ठेवण्यात आले. या सर्व आंदोलनकर्त्यांची अमरावती येथील कारागृहात रवानगी करण्यात आली. कारागृहातच आता राणा आणि त्यांच्या सर्व आंदोलनकर्त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.