सदाभाऊ भाजपला म्हणतात.. 'का रे दुरावा', लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

सदाभाऊ भाजपला म्हणतात.. 'का रे दुरावा', लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

'गरज सरो अन् वैद्य मरो' या उक्तीचा अनुभव सदाभाऊ खोत यांना आला

  • Share this:

सांगली, 15 नोव्हेंबर: भाजपप्रणीत आघाडीशी काडीमोड घेऊन पश्चिम महाराष्ट्रात स्वतंत्र राजकीय चूल उभारण्याची तयारी माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेच्या सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांनी केली आहे. 'गरज सरो अन् वैद्य मरो' या उक्तीचा अनुभव सदाभाऊ खोत यांना आला आहे. त्यामुळे ते वेगळी चूल मांडण्याच्या तयारी आहेत.

सदाभाऊ खोत यांची राजकीय उपयुक्तता संपुष्टात आल्याने भाजपने त्यांना जिल्ह्याच्याही राजकारणातून डावलण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप खोत यांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्याचीच दखल घेतच सदाभाऊ खोत बंडाचं निशाण फडकावण्याच्या प्रयत्नात असल्याचं राजकीय निरीक्षकांकडून सांगितलं जात आहे.

हेही वाचा...जगाला बनावट कोरोना लशीचा धोका; तज्ज्ञांनी दिला सावधानतेचा इशारा

भाजपसाठी (BJP) सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला (Swabhimani Shetkar Sanghatana) रामराम ठोकला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्य मंत्रिमंडळात स्थान दिलं होतं.

दैनिक 'दिव्य मराठी'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी यांनी 5 वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाची युती तोडली होती. त्यानंतर मात्र, राजू शेट्टींचे राजकारण कमकुवत करण्यासाठी त्यांचे सहकारी सदाभाऊ खोत यांच्याशी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळीक साधली होती. एवढंच नाही तर त्यांचा पाठिंबा घेतला होता. नंतर सदाभाऊ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान दिलं होतं. परंतु आता आता भाजपकडून त्यांना डावललं जात आहे.

फडणवीस आता या नेत्याच्या संपर्कात...

केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाविरोधात सदाभाऊ खोतांनी जहरी टीका केली होती. त्यानंतर भाजप पक्षश्रेष्ठींचे खोत यांच्यावरील प्रेम कमी झाल्याचं दिसत आहे. इस्लापूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याशी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूर जुळल्यानंतर खोत यांच्याकडे राजकीयदृष्ट्या कानाडोळा करण्याचा पवित्रा भाजपनं घेतला आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत यांना आपली राजकीय प्रतिष्ठा गमावल्याचं जाणवू लागल्यानंतर त्यांनी भाजपपासून दूर होण्याचे राजकीय संकेत दिले आहेत.

हेही वाचा...बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदी सुशील कुमार मोदींचे नाव निश्चित, आज होणार घोषणा

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात भाजपची आजीव सभासद नोंदणी करण्यात येत होती. सदाभाऊ खोत यांनी सांगली, कोल्हापूर, सातारा या तीन जिल्ह्यांतून आपल्या शेकडो कार्यकर्त्यांचे सभासद नोंदणीचे अर्ज आणि पैसे जमवले. पक्षाने दिलेल्या वेळेतच हे सर्व अर्ज पक्षाकडे सुपूर्द केले. परंतु काही दिवसांपूर्वीच पक्षश्रेष्ठींनी सदाभाऊ यांच्या गटांचे सर्व अर्ज फेटाळत त्यांनी गोळा केलेला निधीही त्यांना परत करण्यात आला आहे. सदाभाऊंनी पक्षसंघटनेत आता आपल्याला स्थान नाही हे जाणून कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यावेळी अनेकांनी भाजपला सोडून वेगळा पर्याय निवडावा, अशी विनंती सदाभाऊ खोत यांच्याकडे केली आहे. आता सदाभाऊ खोत याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: November 15, 2020, 1:24 PM IST
Tags:

ताज्या बातम्या