राज ठाकरे इज बॅक! शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी मनसेचा मेकओव्हर

राज ठाकरे इज बॅक! शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी मनसेचा मेकओव्हर

नव्या झेंड्याचे स्वरुप कसे असणार हे जरी अजून स्पष्ट नसले तरी नव्या झेंड्याचा रंग हा भगवा असणार आहे. यावरून राज ठाकरे यांची हिंदुत्वाची भुमिका अजून ठळक होत आहे.

  • Share this:

मुंबई, 21 जानेवारी : मनसेचे महाधिवेशन दोन दिवसांवर आले आहे, त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी मनसेकडून बॅनरबाजी केली जात आहे. मनसेचे बॅनर कसे असावे याबाबतचे पोस्टर मनसे मध्यवर्ती कार्यालयाने नुकतेच प्रकाशित केले होते. त्यानुसारच पदाधिकाऱ्यांनी नवीन बॅनर तयार केले आहेत. ज्या बॅनरवरुन मनसेचा पूर्वीचा झेंडा गायब आहे. नव्या झेंड्याचे स्वरुप कसे असणार हे जरी अजून स्पष्ट नसले तरी नव्या झेंड्याचा रंग हा भगवा असणार आहे. यावरून राज ठाकरे यांची हिंदुत्वाची भुमिका अजून ठळक होत आहे.

या सोबतच काही दिवसांपूर्वी 'सत्तेसाठी सतराशे साठ मात्र महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट' या मजकूराचे बॅनर्स मनसेकडन लावण्यात आले होते. एकीकडे हिंदुत्वाच्या भुमिकेकडे आगेकूच करत असताना महाराष्ट्र धर्माचा विसर पडू देणार नाही असंही मनसेला सुचवायचे आहे असे दिसून येत आहे. कालच मनसेकडून अधिवेशनाचे दोन व्हिडीओ रिलीज करण्यात आले आहेत. या व्हिडीओला स्वतः राज ठाकरेंनी व्हॉईस ओव्हर दिला आहे. ज्यात छत्रपती शिवाजी महाराज हे केंद्रस्थानी आहेत. छत्रपतींच्या लढाई साठी प्रत्येक जातीचा माणूस लढत होता असा आशय एका व्हिडीओमध्ये आहे तर दुसऱ्या व्हिडीओ मध्ये सगळ्या पक्षांचा आदर्श हे छत्रपती होते असा आशय आहे. एकूणच शिवसेनेची स्पेस घेण्याचा जोरदार प्रयत्न आता मनसेने सुरू केल्याचे दिसतेय.

इतर बातम्या - मोदी सरकारने मास्टर ब्लास्टरला केलं बोल्ड! ड्रीम प्लॅनमधून सचिनलाच काढलं बाहेर

मनसेला फायदा होणार की तोटा? 

खरंतर मनसेची यापूर्वीची भुमिका मराठी अस्मितेची होती. मराठी अस्मितेचा मुद्दा रेटत असताना मनसेने कधीच हिंदुत्वाचाा विरोध केला नाही. याउलट गणेशोत्सव, दहीहंडी  उत्सव आणि रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनीी गोंधळ घातला. त्यावेळी राज ठाकरेंच्याा हिंदुत्वााची बाजू पुढे आली होती. महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा निवडणूूूकीनंतर शिवसेनेनेे विचारभिन्न असलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली. यापूर्वीपर्यंत शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखलाा जायचा. मात्र, आता शिवसेनेचीी हिंदुत्वाची स्पेस रिकामी झाली आहे. तिच घेण्याचा जोरदार प्रयत्न मनसेचा असणार आहे.

दुसरीकडे शिवसेनेपासून दुरावलेल्या भाजपाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न मनसे करताना दिसते. मात्र याच भाजपाच्याा केंद्रीय नेतृत्वावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राजकीय युद्ध पुकारले होते. पुन्हा त्याच भाजपसोबत हात मिळवणी हे दोन्ही पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आवडणारं नाही.

इतर बातम्या - शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा फोटो, सोशल मीडियावर चर्चा

एकवेळ शिवसेनेच्या भुमिकेनं नाराज झालेले शिवसैनिक मनसेकडे वळतील मात्र मनसैनिकांचा सुद्धधा स्वाभिमान जपणं महत्वाचं असणार आहे. गेल्या काळात मनसेला सतत येत असलेल्या पराभवातून सावरण्यासाठी हिंदुत्वाची भुमिका संजीवनी ठरू शकते. मात्र यासाठी राज ठाकरे यांनी पक्ष आणि पक्षातील घडामोडींना गंभीरतेने घेणे गरजेचे आहे.

First published: January 21, 2020, 11:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading