नवी दिल्ली, 21 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गठित केलेल्या ऑल इंडिया स्पोर्ट्स कॉन्सिलमधून (AICS) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि बुद्धीबळ किंग विश्वनाथन आनंद यांना वगळण्यात आले आहे. देशातील खेळाच्या विकासाशी संबंधित मुद्द्यांकडे लक्ष देण्यासाठी ही परिषद स्थापन करण्यात आली आहे. सचिन आणि विश्वनाथन आनंद यांना वगळल्यानंतर आता या परिषदेत क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि कृष्णमचारी श्रीकांत यांचा समावेश आहे. मोदी सरकारच्या वतीने AICSची स्थापना डिसेंबर 2015 करण्यात आली होती. टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार सचिन तेंडुलकर आनंदसमवेत राज्यसभेत होता. या समितीतील सदस्यांची संख्या दुसर्या टर्ममध्ये 27 वरून 18 करण्यात आली. बॅडमिंटनचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद आणि माजी फुटबॉलपटू बायचंग भूटिया यांनाही दुसर्या टर्मसाठी वगळण्यात आले. वाचा- ऑस्ट्रेलियाच्या मदतीसाठी धावून आला सचिन! आता थेट होणार कोच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समितीच्या दोन बैठकींमध्ये सचिन तेंडुलकर आणि आनंद यांच्या नावावर कोणतीही चर्चा झाली नाही. तर, जोपर्यंत गोपचंद टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीत व्यस्त असल्यामुळं त्यांना त्यांच्याकडे एआयसीएस बैठकीत भाग घेण्यासाठी वेळ राहणार नाही, असे सांगण्यात आले आहेत. वाचा- ‘ती घटना फक्त रोहितला माहिती’, प्रवीण कुमारचा आणखी एक धक्कादायक खुलासा समितीमधील नवीन सदस्य: लिंबा राम (तिरंदाजी), पीटी उषा (अथलेटिक्स), बचेंद्र पाल (पर्वतारोहण), दीपा मलिक (पॅरा-अथलेटिक्स), अंजली भागवत (नेमबाज), रणदी सिंग (फुटबॉल) आणि योगेश्वर दत्त (कुस्ती). वाचा- गोलंदाजाचा कहर! 175 किमी वेगाने चेंडू टाकत मोडला अख्तरचा वर्ल्ड रेकॉर्ड?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.