जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आतापर्यंत कुणाला नाही जमले ते मनसे आमदाराने 'करून दाखवलं', डोंबिवलीकर म्हणाले, मानलं!

आतापर्यंत कुणाला नाही जमले ते मनसे आमदाराने 'करून दाखवलं', डोंबिवलीकर म्हणाले, मानलं!

आतापर्यंत कुणाला नाही जमले ते मनसे आमदाराने 'करून दाखवलं', डोंबिवलीकर म्हणाले, मानलं!

कल्याण डोंबिवली परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या परिसरात कोरोनाबाधितांचा आकडा हा 50 पेक्षा जास्त आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

 मुंबई, 13 एप्रिल : महाराष्ट्राला कोरोना व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. राज्याची राजधानी मुंबईही कोरोना व्हायरससाठी केंद्रबिंदू ठरली आहे. मुंबई नजीकच्या उपनगरातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. जो तो आपल्या परिने कोरोना लढ्यात योगदान देत आहे. मनसेचे एकमेव असलेले डोंबिवली ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी जे काम केलंय त्याचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. कल्याण डोंबिवली परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या परिसरात कोरोनाबाधितांचा आकडा हा 50 पेक्षा जास्त आहे तर आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवली परिसरात कोरोनाबाधित रुग्णाला थेट मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलवावे लागत होते. त्यातही रुग्णाला नेण्यासाठी योग्य सुविधाही नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत होता. हेही वाचा - ‘आम्हाला जरी कोरोना नसला तर इथं होईल’, परिचारिकेच्या भीतीने सर्वच हादरले हीच बाब लक्षात घेऊन राजू पाटील यांनी शहरातील एखादं खासगी रुग्णालय उपचारासाठी ताब्यात घ्यावं असा सल्ला पालिका आयुक्तांना दिला होता. तसंच आपल्या ताब्यातील असलेलं शहरातील आर.आर. हॉस्पिटल पालिकेच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला होता. याबद्दल त्यांनी तशी तयारीही दाखवली होती. अखेर आयुक्तांनी राजू पाटील यांनी दिलेला सल्ला मान्य करत रुग्णालय ताब्यात घेण्यास परवानगी दिली आहे.

जाहिरात

आयुक्तांच्या या परवानगी नंतर डोंबिवली शहरातील आर.आर.हॉस्पिटल हे पालिकेनं आपल्या ताब्यात घेतलं आहे. याबद्दल राजू पाटील ट्वीट करून माहिती दिली आहे. राजू पाटील आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, ‘कल्याण डोंबिवली पालिकेच्या हद्दीत पहिला COVID + रूग्ण सापडल्यानंतर आयुक्तांना डोंबिवलीतील एखादा खाजगी दवाखाना फक्त COVID19 साठी घ्यावा अशी सुचना केली होती.आवश्यकता वाटल्यास आमचे RR हॉस्पिटल तात्पुरते ताब्यात देण्याची तयारी दाखवली होती,ती मान्य झाली.येथे IMA च्या डाॅक्टरांचे सहाय्य घेऊन उपचार केले जातील.’ हेही वाचा - ‘तुम्ही महिला असाल तर…’, सर्वांसमोरच घातली पुणे पोलिसांना लग्नाची मागणी डोंबिवली पूर्व भागात एमआयडीसी परिसराला लागून अद्यावत असे हे आर.आर.हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधाही उपलब्ध आहे. राजू पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाचा सर्वच स्तरातून कौतुक होतं आहे. डोंबिवलीकरांनीही त्यांचे आभार मानले आहे. हेही वाचा - घसा ओला करण्यासाठी तळीरामांनी केला कहर, पोलीसही गेले चक्रावून! दरम्यान, कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील दिवा शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. त्यानंतर या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाय योजना केल्या आहेत. याबद्दल राजू पाटील यांनी आढावा घेतला. तसंच लॉकडाउनमध्ये नागरिकांना कशी मदत करता येईल, याबाबत सहाय्यक आयुक्त डॉ.सुनिल मोरे यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी, निलेश पाटील, तुषार पाटील, अँड.आदेश भगत, विजय भोईर,सचिन भोईर,तेजस पोरजी आणि महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात