'तुम्ही महिला असाल तर माझ्याशी लग्न करा...', सर्वांसमोरच घातली पुणे पोलिसांना लग्नाची मागणी, पुढे काय घडलं?

'तुम्ही महिला असाल तर माझ्याशी लग्न करा...', सर्वांसमोरच घातली पुणे पोलिसांना लग्नाची मागणी, पुढे काय घडलं?

पुणे पोलिसांचा विनोदी अंदाज एका ट्विटर यूझरला आवडला आणि त्याने थेट लग्नाचीच मागणी घालून टाकली.

  • Share this:

पुणे, 13 एप्रिल : नागरिकांना विविध बाबींची माहिती देण्यासाठी पुणे पोलीस ट्विटरवर मोठ्या प्रमाणात सक्रीय आहेत. नागरिकांच्या प्रश्नांना कधी काटेकोरपणे तर कधी विनोदी आणि उपहासात्मक पद्धतीने उत्तर देण्यासाठी पुणे पोलिसांचं ट्विटर हँडल ओळखलं जातं. सध्या लॉकडाऊनच्या काळातही पुणे पोलीस आपल्या ट्विटर हँडलवरून लोकांना घरी राहण्याच्या सूचना देत आहेत आणि जे लोक सूचना ऐकत नाहीत, त्यांची चांगलीच फिरकी घेत आहेत. पुणे पोलिसांचा हाच अंदाज एका ट्विटर यूझरला आवडला आणि त्याने थेट लग्नाचीच मागणी घालून टाकली.

'नमस्कार, जो कोणी हे ट्विटर हँडल हाताळत आहे ... ती तुम्ही वीस वर्षातील एक महिला असाल तर कृपया माझ्या लग्नाचा प्रस्ताव स्वीकारा. मी आयुष्याच्या उत्तरार्धात अंतराळ प्रवासाची योजना करीत आहे,' असं म्हणत एकाने लग्नाची मागणी घातली.

आता असल्या मागणीला गमतीशीर उत्तर देणार नाहीत ते पुणे पोलीस कसले. ट्विटर यूझरच्या या प्रस्तावावर उत्तर देत पुणे पोलिसांनी षटकारच ठोकला.

'ही मागणी फेटाळणे काहीसं कठीण आहे, पण या टीममध्ये अनेक महिला आणि पुरूषही काम करतात...बहुतेक जण खाकी वर्दीतले...जे फक्त पुण्याच्या फेऱ्या घालणे पसंत करतात..फक्त पुण्याच्या,' असं उत्तर पुणे पोलिसांकडून देण्यात आलं.

दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात अनेक नागरिक घरबसल्या ट्विटरवरून पुणे पोलिसांशी संवाद साधत असतात. यावेळी काहीजण कायदा आणि सुव्यवस्थेवरून तक्रारी करतात तर काहीजण आपल्या मनातील शंका विचारतात. पुणे पोलीस मात्र या सर्वांना आपल्या अनोख्या अंदाजात उत्तर देताना पाहायला मिळतात.

First published: April 13, 2020, 9:42 AM IST

ताज्या बातम्या