'आम्हाला जरी कोरोना नसला तर इथं होईल', परिचारिकेच्या भीतीने सर्वच हादरले

'आम्हाला जरी कोरोना नसला तर इथं होईल', परिचारिकेच्या भीतीने सर्वच हादरले

'सुश्रुषा रुग्णालयाने आम्हाला वाऱ्यावर सोडलं आहे. आम्ही इतकी वर्ष सेवा देतोय पण प्रत्यक्षात मात्र, रुग्णालयाने आम्हाला सरळ हाकलून लावलं'

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल :  मुंबईत कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. राज्यात मुंबईत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. वरळी, कोळीवाडा, धारावी, लोअर परळ हे परिसर कोरोनासाठी व्हॉटस्पॉट ठरले आहे. 3 दिवसांपूर्वी दादर येथील सुश्रुषा रुग्णालयातील परिचारिकांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली. त्यानंतर इतरही परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना धारावीतच क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

20 परिचारिका आणि  इतर स्टाफ असे एकूण 60 जणांना धारावीच्या राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ठेवण्यात आलं आहे.  सुश्रुषा प्रशासनानं या सगळ्यांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण अपेक्षित होतं. पण सरळसरळ जबाबदारी झटकण्यात आल्याची बाबसमोर आली आहे.

हेही वाचा - नागपुरमध्ये कोरोना वाढतोय, एका दिवसांत रुग्णांची संख्या पोहोचली 44 वर

'आम्हाला कोणतेही कारण नसताना धारावीमध्ये नेऊन टाकलं', असा आरोप परिचारिकांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे,   त्यांच्याबरोबर एक पॉझिटिव्ह रुग्ण सुद्धा आहे आणि सोशल डिस्टन्स इन काही पाळला जात नसल्याची माहिती सुद्धा या परिचारिकांनी दिली.

अशा या वातावरणात आम्हाला जरी कोरोनाची लागण झाली नसेल तरीही इथे आल्यावर मात्र आम्हाला लागण होणार आहे, अशी भीतीच या परिचारिकांनी बोलावून दाखवली आहे.

हेही वाचा -कोल्हापूरमध्ये धक्कादायक कारवाई, दुधाच्या टँकरमध्ये मुंबईकर करत होते प्रवास

सुश्रुषा  रुग्णालयाने आम्हाला वाऱ्यावर सोडलं आहे.आम्ही इतकी वर्ष सेवा देतोय पण प्रत्यक्षात मात्र, रुग्णालयाने आम्हाला सरळ हाकलून लावलं. आम्हाला सांगितलं गेलं की, आम्ही तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी नेतोय आणि आणून धारावी टाकलं गेलं' अशी तीव्र नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

संपादन - सचिन साळवे

First published: April 13, 2020, 9:52 AM IST
Tags:

ताज्या बातम्या