वर्धा, 13 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे राज्यात 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आली आहे. वर्धा जिल्हा तसा दारू बंदी जिल्हा. पण, तळीरामांची, अवैध दारू व्यावसायिकांची संख्या इथं कमी नाही. लॉकडाउनमुळं तळीरामांची मोठी अडचण झालीये. मग, घसा ओला करण्यासाठी चक्क उत्पादन शुल्क विभागाच्या मालखान्यातच हात साफ केला आहे.
सध्या लॉकडाउनमुळं बार, दारूची दुकानं बंद आहे. बंदी असली तरीही वर्ध्यात चोरट्या मार्गानं अनेक जण दारू आणतात. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करताना जप्त केलेला दारूसाठा, मुद्देमाल आरती चौकातील मालखान्यात ठेवल्या जातो.
हेही वाचा - रस्त्यावर तुफान वेगात कारने फिरत होता नकली IAS, पोलिसांनी चौकशी करताच ओकला सत्य
चोरट्यांनी चक्क या मालखान्यालाच लक्ष केलं. मालखान्याच्या टिना वाकवून चोरट्यांनी रात्रीच्या वेळी दारूसाठा लंपास केला. यावेळी कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाला संशयास्पद हालचाली दिसल्यानं अधिकारी आणि पोलिसांना ही माहिती दिली.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर वर्धा शहर पोलिसांनी मालखाना गाठून चार जणांना अटक केली. निलेश फुलहार, मनोज उईके, सुनील वनकर, बबलू ठाकूर अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहे. त्यांच्याकडून एक लाख रुपयांचा दारूसाठा जप्त केला. त्यात तीस हजार रुपयांची एक दुचाकी जप्त पण करण्यात आली.
हेही वाचा - कोरोनाला रोखण्यासाठी परदेशी मीडियाकडून केरळचं केलं जातंय कौतुक
सध्या तळीरामांचा घसा दारूअभावी कोरडा झाला आहे. कुठं दारूचं गोदाम, कुठं दुकान फोडल्या गेलं. वर्ध्यात चक्क माल खान्यातच हात साफ केल्या गेला आहे. याआधी नागपूरमध्ये 4 बिअर बार फोडण्यात आले आहे. तर सोलापूरमध्ये तर दारुड्यांनी वाईन शॉपच फोडून दारूची चोरी केली होती.
संपादन - सचिन साळवे