पुणे, 26 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांपासून कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा विधानसभा मतदारसंघ तर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड मतदारसंघ रिक्त झाला होता. आज या दोन्ही पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. आज मतदानाच्या दिवशी लक्ष्मण जगताप यांची मुलगी ऐश्वर्या जगताप या वडिलांच्या आठवणीने भावुक झाल्याच्या पहायला मिळाल्या. काय म्हणाल्या ऐश्वर्या जगताप? आज बाबांची खूप आठवण येते, वडिलांचं निधन झाल्यानंतर मागे उरलेली आईचं कुटुंबासाठी वडील असते. माझ्या आईमध्ये मी माझे वडील बघते आहे, आणि मतदार देखील आम्हाला तोच विश्वास ठेवून विजयी करतील असा विश्वास लक्ष्मण जगताप यांच्या कन्या ऐश्वर्या जगताप यांनी व्यक्त केला आहे. ऐश्वर्या मागील पंधरा दिवसांपासून त्यांच्या आईसोबत म्हणजे भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून प्रचार करताना दिसल्या होत्या. मात्र आज वडिलांच्या आठवणीने त्या भावुक झाल्या.
pune by-poll election : मतदानासाठी पैसे घेतले नाही, भाजपच्या माजी नगरसेवकाने केली मारहाणचिंचवडमध्ये तिरंगी लढत ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी माघार न घेतल्यानं चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार आहे. भाजपकडून आश्वीनी जगताप यांना तर महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता चिंचवडमध्ये अश्वीनी जगताप, नाना काटे आणि राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होणार आहे. आज या पोटनिवडणुकीसाठी मतदान होत असून, निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.