मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /''आनंदराव अडसूळ यांनी मराठी माणसाची फसवणूक केली'', आमदार रवी राणांचा आरोप

''आनंदराव अडसूळ यांनी मराठी माणसाची फसवणूक केली'', आमदार रवी राणांचा आरोप

सिटी बँक घोटाळा प्रकरणी बडनेराचे युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी तक्रार केली होती.

सिटी बँक घोटाळा प्रकरणी बडनेराचे युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी तक्रार केली होती.

सिटी बँक घोटाळा प्रकरणी बडनेराचे युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी तक्रार केली होती.

अमरावती, 27 सप्टेंबर: शिवसेना नेते (Former Shiv Sena leader) आणि अमरावतीचे माजी खासदार माजी मंत्री आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) आणि त्यांचे पुत्र माजी आमदार अभिजीत अडसूळ (Abhijeet Adsul) यांना ईडीने (Summoned by the ED) समन्स बजावले आहेत. सिटी बँक घोटाळा प्रकरणी बडनेराचे युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरून ही कारवाई झाल्याचं बोललं जात आहे. यावर आता रवी राणा यांची प्रतिक्रिया समोर येत आहे.

सिटी बँकेच्या माध्यमातून मराठी माणसाची अडसूळ यांनी फसवणूक केल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे. तसंच ईडीची कारवाई अत्यंत योग्य आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्या मराठी खातेदारांना न्याय मिळाला पाहिजे. जे न्यायासाठी धडपडत होते, असंही रवी राणा यांनी म्हटलं आहे.

अमरावतीच्या घराला कुलूप

आनंदराव अडसूळ यांना कथित सिटी को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळाप्रकरणी त्यांच्या कांदिवली-मुंबई येथील निवास्थानी इडीचे समन्स दिल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर अमरावती येथील अडसूळ यांच्या निवासस्थानी सुद्धा छापा पडल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र अमरावती येथील निवासस्थानाला सध्या कुलूप लागलेलं आहे.

हेही वाचा- Video: मोठी वाहतूक कोंडी, ठाणे- नाशिक महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

अडसूळ यांच्यावरील आरोप

सिटी बँकेत 900 कोटींच्या घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप आहे. भाजप आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर आता ईडी त्यांची चौकशी करणार आहे. आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि NPA मध्ये घसरण झाली. घसरणीमुळे बँक गेल्या 2 वर्षांपासून बँक बुडीत आहे.

हेही वाचा- आता जोधपूर विमानतळावर एकत्र दिसले आलिया-रणबीर; या कारणामुळं पुन्हा रंगली लग्नाची चर्चा

5 जानेवारी रोजी बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप केला. अडसूळ यांच्या विरोधात कागदपत्र सादर करण्यासाठी राणा ईडीच्या कार्यालयातही गेले होते. मुंबईमध्ये सिटी को-ऑप बँकेच्या 13 ते 14 शाखा आहेत. या बँकेत 900 खातेदार असून ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटण्यात आलेलं कर्ज कारणीभूत असल्याचा आरोप रवी राणा यांच्याकडून करण्यात आला होता. अडसूळ यांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली. खातेदारांना फक्त एक हजार एवढी रक्कम मिळत असल्याचंही रवी राणा यांनी आपल्या आरोपात म्हटलं होतं.

First published:

Tags: Ravi rana, Shivsena