मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /आता जोधपूर विमानतळावर एकत्र दिसले आलिया-रणबीर; या कारणामुळं पुन्हा रंगली लग्नाची चर्चा

आता जोधपूर विमानतळावर एकत्र दिसले आलिया-रणबीर; या कारणामुळं पुन्हा रंगली लग्नाची चर्चा

Ranbir Kapoor and Alia Bhatt

Ranbir Kapoor and Alia Bhatt

रणबीरच्या वाढदिवसापूर्वीच दोघेही जोधपूरला (Jodhpur) पोहोचले आहेत. जोधपूर विमानतळावरचा (Jodhpur airport) दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    मुंबई 27 सप्टेंबर : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हे बॉलिवूडमधल्या (Bollywood) सर्वांत हॉट कपलपैकी एक आहे. अनेक वर्षांपासून दोघे रिलेशनशिपमध्ये (relationship) आहेत. त्यांचं नातं त्यांनी सर्वांसमोर मान्यही केलं आहे. त्यामुळे दोघं लग्न (marriage) कधी करणार याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे.

    रणबीरच्या वाढदिवसापूर्वीच दोघेही जोधपूरला (Jodhpur) पोहोचले आहेत. जोधपूर विमानतळावरचा (Jodhpur airport) दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोघांच्या या सरप्राइज ट्रिपव्यतिरिक्त आणखी एक मोठी चर्चादेखील होत आहे. आलिया आणि रणबीर जोधपूरमधलं त्यांच्या लग्नाचं ठिकाण पाहण्यासाठी तर आले नाहीत ना, अशी शंका अनेक चाहत्यांना आली आहे. याबाबतचं वृत्त 'आज तक'ने दिलं आहे.

    Bigg Boss Marathi च्या घरातील 'या' स्पर्धकाचे लवकरच येणार रोमॅण्टिक गाणं

    छायाचित्रात आलिया टाय डाय ग्रीन डेनिम जॅकेट आणि जीन्समध्ये दिसली, तर रणबीरने बरगंडी रंगाचे कॅज्युअल कपडे घातले होते. विमानतळातून बाहेर पडतानाचा हा फोटो व्हायरल होत आहे. रणबीर कपूर 28 सप्टेंबर रोजी आपला 39वा वाढदिवस साजरा करणार आहे. वाढदिवसाच्या आधीच दोघे जोधपूरला आले आहेत. त्यामुळे ते येथे वाढदिवस साजरा करणार हे नक्की; पण त्याच वेळी त्यांच्या लग्नाच्या स्थळाची चर्चादेखील आहे; मात्र यावर अद्याप त्यांच्याकडून कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही.

    गेल्या वर्षी रणबीरने त्याचा वाढदिवस कुटुंबासोबत साजरा केला. आलियाने रणबीरच्या वाढदिवसाचा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये रणबीर, त्याची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर-साहनी यांच्यासह आलिया लंच करताना दिसली होती.

    सोनाली कुलकर्णीच्या Reel एक्सप्रेशन्स पाहूण नॅशनल क्रशलाही विसराल...

    गेल्या वर्षी राजीव मसंदला दिलेल्या मुलाखतीत रणबीरने आपल्या लग्नाविषयी वक्तव्य केलं होतं. मुलाखतीमध्ये रणबीरनं हेदेखील मान्य केलं होतं, की, कोरोना विषाणूची साथ आली नसती, तर एव्हाना त्याचं आलियाशी लग्न झालेलं असतं. 'मला माझ्या आयुष्याचं हे ध्येय लवकरच गाठायचं आहे,' असंही रणबीरने म्हटलं होतं.

    रणबीरच्या या वक्तव्यानंतर आलियासोबतच्या लग्नाच्या बऱ्याच बातम्या आल्या; पण दोघांनीही मौन पाळलं. आता जोधपूरमध्ये लग्नाचं ठिकाण बघण्याबाबतच्या चर्चा किती खऱ्या आहेत हे लवकरच कळेल.

    आलिया भट्ट आणि रणबीर कपूर गेल्या ४ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लारा दत्तानं आलिया-रणबीरच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला. ते दोघंही या वर्षी लग्न करतील असं लारानं म्हटलं आहे. रणबीर आणि आलिया आगामी 'ब्रह्मास्त्र' सिनेमात एकत्र दिसणार आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित या सिनेमात अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

    First published:

    Tags: Alia Bhatt, Bollywood, Ranbir kapoor