मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Thane Latest News: ठाणे-नाशिक महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, Oil Tankerचा अपघात

Thane Latest News: ठाणे-नाशिक महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, Oil Tankerचा अपघात

ठाणे नाशिक महामार्गावर (Thane-Nashik highway) अभूतपूर्व वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाल्याचं पाहायला मिळत आहे.

ठाणे नाशिक महामार्गावर (Thane-Nashik highway) अभूतपूर्व वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाल्याचं पाहायला मिळत आहे.

ठाणे नाशिक महामार्गावर (Thane-Nashik highway) अभूतपूर्व वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाल्याचं पाहायला मिळत आहे.

ठाणे, 27 सप्टेंबर: ठाणे नाशिक महामार्गावर (Thane-Nashik highway) अभूतपूर्व वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाल्याचं पाहायला मिळत आहे. ऑईल टँकर (Oil Tanker) पलटी झाल्यानं दहा ते बारा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.

काल रात्री ठाण्यातील घोडबंदर रोडवर ठाण्याच्या दिशेनं येत असलेल्या एका ऑईल टँकर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्यामुळे भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामुळे रस्त्यावर प्रचंड प्रमाणात ऑईल पसरल्यानं वाहतूक कोंडी झाली आहे. त्यातच खड्ड्यांमुळे आधीच त्रस्त असलेल्या वाहनचालकांचं जीवन आता या कोंडीमुळे आणखीनच असहाय्य झालं आहे.

रस्त्यावर माती टाकून सांडलेलं तेल साफ करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच वाहतूक कोंडी सुटेल असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा- आज भारत बंद, महाराष्ट्रभर बंदचे पडसाद; अनेक ठिकाणी निषेध आंदोलन

संपूर्ण ठाणे शहरातील रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरलं असून या खड्ड्यांमधून गाडी चालवताना वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे ठाण्यातील सर्व रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना तासन् तास गाडीत बसून राहावे लागत आहे.

तीन दिवसांपूर्वीच ठाण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण स्थितीचा पाहणी दौरा करून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना चांगलेच झापले होतं. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर करावे असे सक्त आदेश दिले होते. मात्र काल रात्री ठाण्याच्या दिशेनं येणाऱ्या एका ऑईल टॅंकरचा अपघात होऊन प्रचंड प्रमाणात ऑईल या रस्त्यावर पसरलं आणि वाहतूक कोंडीमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडली.

हेही वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, दिलं 'हे' आश्वासन

ठाणे घोडबंदरहून नाशिककडे जाणाऱ्या महामार्गावर जवळपास दहा ते बारा किलोमीटर लांबीच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. अवजड वाहनांना रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेतच शहरात प्रवेश करण्याची मुभा असली तरीही काही अवजड वाहने नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर धावताना दिसत आहेत. तर काही वाहने या अपघातामुळे रस्त्यात धडकल्यानं दिवसादेखील वाहतुकीवर मोठा ताण पडत आहे.

रस्त्यावर पसरलेल्या ऑईलवर माती टाकण्यासाठी निघालेले दोन ते तीन मातीचे डंपर देखील रस्त्यातच अडकले असल्यानं या कामात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

First published:

Tags: Thane