जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / उद्धव ठाकरेंना जुमानलं नाही... तर हा कोण? रवी राणांचा बच्चू कडूंवर पलटवार

उद्धव ठाकरेंना जुमानलं नाही... तर हा कोण? रवी राणांचा बच्चू कडूंवर पलटवार

उद्धव ठाकरेंना जुमानलं नाही... तर हा कोण? रवी राणांचा बच्चू कडूंवर पलटवार

माझे नेते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचा सन्मान करुन मी दिलगिरी व्यक्त केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 2 नोव्हेंबर : आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद अखेर मिटला आहे. रविवारी मध्यरात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कडू आणि राणा वादावर दोन तास चर्चा झाली. त्यानंतर सकाळी रवी राणा यांनी सकाळी फडणवीस यांच्या बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर खुद्द फडणवीस यांनी खुलासा केला. यानंतर आज बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये शक्तीप्रदर्शन करत मोर्चाला संबोधित केले. या मोर्चामध्ये रवी राणा यांची ही पहिली वेळ आहे. त्यांना माफ करतो. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली त्याचा आनंद आहे नाहीतर आम्हालाही हातपाय हालवावे लागले असते. माफी मागितली त्याचेही आभार आहेत. तुम्ही दोन पाऊल गेले. आम्हीही चार पाऊल मागे जातो, असे ते यावेळी म्हणाले. यानंतर काही झालं तर प्रहारचा वार कसा असतो, ते आम्ही दाखवू, असा इशाराही त्यांनी दिला. यानंतर आता रवी राणा यांनी यावर वक्तव्य केले आहे. काय म्हणाले रवी राणा - “प्रेमाची भाषा रवी राणाला 100 वेळा कळते. पण कोणी दम देत असेल तर मी घरात घूसून मारू शकतो. मी सर्व वाद मिटवला. उद्धव ठाकरे आडमुठे होते. त्यांचा अहकांर धुळीत मिळाला. मग हा कोण आहे. तर मी घरात घूसून मारू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे नेते आहेत. त्यांनी मला सांगितले म्हणुन मी सगळा वाद मिटवला. बच्चू कडू माझ्यासाठी खूप छोटा विषय आहे,” या शब्दात रवी राणांनी बच्चू कडूंवर प्रहार केला. “कुणी मला दम देत असेल तर मी उद्धव ठाकरेंचा दम खाल्ला नाही, हा बच्चू कडू तर काहीच नाही. जर देऊन जर त्याला जशास तसे उत्तर मी देईल. कुठल्याही स्तरावर देईल, तो ज्या स्तरावर म्हणेन त्या स्तरावर देईन. पण प्रेमाच्या भाषेत रवी राणा एकदा नाही तर दहावेळा झुकेन. पण कुणी दम देऊन बोलत असेल तर त्याला घरात घुसून मारायची पण माझी हिम्मत आहे.”

हेही वाचा -  राणानं दिलगिरी व्यक्त केली त्याचा आनंद, नाहीतर…; वादानंतर बच्चू कडूंचं अमरावतीमध्ये शक्तीप्रदर्शन “माझे नेते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचा सन्मान करुन मी दिलगिरी व्यक्त केली आहे. मी दोन पाऊले मागे आलो आहे. कुणाचंही मन दुखू नये यासाठी तो विषय मी तिथेच संपवला. उद्धव ठाकरेसुद्धा असेच अखडून राहत होते. मात्र, त्यांना मातीत धूळ खावी लागली. म्हणजे लोक अशाप्रकारे अखडतात, जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचाही सन्मान करत नाही, वाद मिटल्यावरही दादागिरीची भाषा वापरत असेल तर बच्चू कडू हा विषय माझ्यासाठी विषय अगदी छोटा आहे. त्याला कुठल्या भाषेत कधी उत्तर द्यायचे ते मला कळते,” या शब्दात रवी राणांनी बच्चू कडूंना प्रत्युत्तर दिले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात