जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राणानं दिलगिरी व्यक्त केली त्याचा आनंद, नाहीतर...; वादानंतर बच्चू कडूंचं अमरावतीमध्ये शक्तीप्रदर्शन

राणानं दिलगिरी व्यक्त केली त्याचा आनंद, नाहीतर...; वादानंतर बच्चू कडूंचं अमरावतीमध्ये शक्तीप्रदर्शन

राणानं दिलगिरी व्यक्त केली त्याचा आनंद, नाहीतर...; वादानंतर बच्चू कडूंचं अमरावतीमध्ये शक्तीप्रदर्शन

या सगळ्या आंदोलनात मागच्या 7 दिवसात अनेकांनी ज्या भावना व्यक्त केल्या तसेच ज्यांनी मध्यस्थी केली त्यांचे आभार मानतो, असेही आमदार बच्चू कडू म्हणाले.

  • -MIN READ Amravati,Maharashtra
  • Last Updated :

अमरावती, 1 नोव्हेंबर : आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद अखेर मिटला आहे. रविवारी मध्यरात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कडू आणि राणा वादावर दोन तास चर्चा झाली. त्यानंतर सकाळी रवी राणा यांनी सकाळी फडणवीस यांच्या बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर खुद्द फडणवीस यांनी खुलासा केला. यानंतर आज बच्चू कडू यांनी अमरातवतीमध्ये शक्तीप्रदर्शन करत मोर्चाला संबोधित केले. काय म्हणाले बच्चू कडू -  रवी राणा यांची ही पहिली वेळ आहे. त्यांना माफ करतो. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली त्याचा आनंद आहे नाहीतर आम्हालाही हातपाय हालवावे लागले असते. माफी मागितली त्याचेही आभार आहेत. तुम्ही दोन पाऊल गेले. आम्हीही चार पाऊल मागे जातो, असे ते यावेळी म्हणाले. यानंतर काही झालं तर प्रहारचा वार कसा असतो, ते आम्ही दाखवू, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच या सगळ्या आंदोलनात मागच्या 7 दिवसात अनेकांनी ज्या भावना व्यक्त केल्या तसेच ज्यांनी मध्यस्थी केली त्यांचे आभार मानतो, असेही आमदार बच्चू कडू म्हणाले. हेही वाचा -  बच्चू कडू माझ्या एका फोनवर गुवाहाटीला गेले होते, फडणवीसांचा गौप्यस्फोट, रवी राणा पडले तोंडघशी! गरिबाची पोरगी पळाली तर… आम्ही उठाव केला आहे. शरद पवारांनी 2014 मध्ये भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. तो त्यांच्या सोयीचा होता. त्या विषयाचा होता. पण ते म्हणतात ना, “गरिबाची पोरगी पळाली तर ती पळून गेली आणि श्रीमंताची पोरगी पळून गेली तर ते लव्ह मॅरेज” म्हणजे गरिबांचं कारटं आणि श्रीमंताचं मग, साहेब आहे का तो? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आज सगळ्या पक्षात बंडखोर आहेत. कोणत्या पक्षात बंडखोर नाही, जे बंडखोर आहेत तेच पहिल्या पंगतीत आहे. फेसबुकच्या कमेंटवर जाऊ नका. आजकाल अर्धा सोशल मीडियासुद्धा पैशानं चालतो. 500-600 लोकांना जर पैशे दिले तर आणि त्यांना कमेंट करायला सांगितलं तर काय वेळ लागणार? खरी बाजू समोरच येत नाही. सध्या मला जितके मीडियावर दाखवण्यात येत आहे तितके जर शेतकरी आंदोलनात दाखवले असते तर 5-6 मागण्या पूर्ण झाल्या असत्या, असेही ते यावेळी म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात