जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दरवाढ आंदोलनाला गालबोट, दूध उत्पादक शेतकऱ्यानं विष प्राशन करून संपवलं जीवन

दरवाढ आंदोलनाला गालबोट, दूध उत्पादक शेतकऱ्यानं विष प्राशन करून संपवलं जीवन

दरवाढ आंदोलनाला गालबोट, दूध उत्पादक शेतकऱ्यानं विष प्राशन करून संपवलं जीवन

दूधाला दरवाढ मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यभरात आंदोलन पुकारलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

शिर्डी, 22 जुलै: दूधाला दरवाढ मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यभरात आंदोलन पुकारलं आहे. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर दूधाची नासाडी केल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. दूध दरवाढ आंदोलनाला गालबोट लागलं आहे. एका दूध उत्पादक शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हेही वाचा… प्रकल्प अधिकाऱ्यानं अंगणवाडी महिलांच्या ग्रुपवर पोस्ट केला स्वतःचा न्यूड फोटो दूधाला भाव नसल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या राहुरी तालुक्यातील दरडगावच्या रेवन्नाथ काळे या 55 वर्षीय शेतकऱ्यानं विष प्राशन करून स्वतःचं जीवन संपवलं आहे. दूध दरवाढीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. राहुरी तालुक्यातील दरडगाव, बेलापूर येथील रेवन्नाथ मुरलीधर काळे यांनी आज (बुधवारी) पहाटे राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून स्वतःचे जीवन संपवले आहे. दुधाला भाव नाही अशा बिकट परिस्थितीत आपले कुटूंब चालवायचे कसे ? जनावरांना जगवायचं कसं? या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचं रेवन्नाथ काळे यांचे भाऊ अरुण काळे यांनी सांगितलं. रेवन्नाथ काळे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांचा दुग्ध व्यवसाय हाच उदरनिर्वाहाचा प्रमुख व्यवसाय आहे. श्रीरामपूर झालेल्या दूध आंदोलनातही त्यांनी सक्रिय भाग घेतला होता, असं राजेंद्र भांड यांनी सांगितलं. हेही वाचा… ‘आम्ही कायबी करीन, आमचं दूध हाय’ शेतकऱ्याच्या लेकाने केली दुधाने अंघोळ, VIDEO मृत रेवन्नाथ काळे यांचा मोठा परिवार आहे. पत्नी दोन मुलगे, तीन विवाहित मुली अशा परीवाराची उपजीविका दूध व्यवसायावर अवलंबून आहे. याच विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली? की अन्य काही कारणाने? हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात