राहुरी,नगर, 07 डिसेंबर : राहुरी कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. कार्यक्रमात सुरुवातीला त्यांचं भाषण झालं आणि राष्ट्रगीत सुरू असताना गडकरींना भोवळ आली. राज्यापालांनी गडकरींना सावरलं. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली त्यांची प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. बरं इतकंच नाही तर ते आता पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले आहेत.